युवा सेने मार्फत तरुणांना नवीन व्यवसायाच्या संधीसाठी आर्ट एफएक्स स्कूल ऑफ ॲनिमेशन या अकादमी चे जंगी उद्घाटन
पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल युवा सेने मार्फत तरुणांना नवीन व्यवसायाच्या संधीसाठी उद्योजक युवासेना पनवेल युवा अधिकारी अजय पाटील यांच्या आर्ट एफएक्स स्कूल ऑफ ॲनिमेशनच्या नवीन व्यवसायाचे जंगी उद्घाटन शिवसेना उपनेते, राज्य संघटक आणि व्यावसायिक सदस्य बाळ माने यांच्या हस्ते पार पडले. १५ वर्ष आपल्या ॲकॅडमीच्या शेकडो तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देऊन संपूर्ण अजय पाटील यांनी आपला स्वतःचा ब्रँड एआरटी एफएक्स स्कूल ऑफ ॲनिमेशन या नावाने लाँच करत पनवेल नवतरुणाना शिक्षण नविन पालक उपलब्ध करून दिले आहे. ॲनिमेशनमध्ये पदवी, ॲनिमेशन एफएक्स गेमडिझाइन आणि डेव्हलपमेंटमध्ये मास्टर, एफएक्स ॲनिमेशन आणि गेमडिझाइनमध्ये मास्टर, ॲनिमेशनमध्ये मास्टर, व्हिज्युअलफिल्म मेकिंगमध्ये मास्टर, एफएक्स आणि कंपोझिटिंगमध्ये मास्टर, एफएक्समध्ये मास्टर, वास्तुविशारदात मास्टर, एमओएस 3. ग्राफिक विथ पॉवर ऑफ GEN AI यासह विविध कोर्सेस ARTfx. च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, शिवसेना सह संपर्क प्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पराग मोहिते, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदिप तांडेल, तालुका संघटक रामदास पाटील, विधानसभा चिटणीस सुशांत सावंत, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, विभागप्रमुख धनंजय पाटील, शहर अधिकारी निखिल भगत, विभागप्रमुख हनुमंत खंडागळे आदी शिवसैनिक तथा मान्यवर उपस्थित होते.
