विद्यार्थ्यांनी केले कोण फाटा येथे वाहतूक नियमन

 विद्यार्थ्यांनी केले कोण फाटा येथे वाहतूक नियमन

रसायनी/प्रतिनिधी दि.२४-पोलीस उप  आयुक्त तिरुपती काकडे सहाय्यक पोलीस उप आयुक्त विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ पो हवा संजय गावडे पो हवा जितेंद्र कदम ज्ञानेश्वर वाघ यांच्या संकल्पनेतून

 राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 च्या अनुषंगाने आज रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जनता माध्यमिक हायस्कूल आजीवली तालुका पनवेल  मधील आर एस पी चे विद्यार्थ्यांचीं रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये फ्लेक्स बोर्ड दाखवून  प्रबोधन करण्यात आले सदरची रॅली अजिवली ते कोण फाटा दरम्यान घेण्यात आली कोण फाटा येथे आल्यानंतर आरएसपी च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांचे सोबत वाहतूक नियमन केले तसेच आर एस पी चे विद्यार्थ्यांनी, वाहतूक अधिकारी व अंमलदारांनी कॅलेंडर व स्टिकर्स वाहन चालकांना वाटप करून वाहन चालकांना वाहतूक नियम पाळणे बाबत प्रबोधन करण्यात आले.