भारतीय जनता पार्टीच्या 'राष्ट्रीय अध्यक्षपदी' निवड झाल्याबद्दल म मा.श्री.नितीनजी नबिन साहेब यांची आ.विक्रांत पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
पनवेल/प्रतिनिधी,दि.२१- जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नव-निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांना दिल्ली येथे शुभेच्छा देताना भाजपचे युवा नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
राष्ट्रीय परिषद सदस्य म्हणून या राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेचा भाग होऊ शकल्याबद्दल श्रीं विक्रांत पाटील यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
यावेळी आमदार विक्रांत दादा पाटील यांनी नितीन नबीन जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक संघटित, बळकट आणि जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. संघटनात्मक मजबुती, राष्ट्रहिताची भूमिका आणि कार्यकर्त्यांच्या ऊर्जेच्या बळावर भाजप आगामी काळात देशभरात नवे यश मिळवेल, असेही त्यांनी नमूद केले.
पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, नवे नेतृत्व देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
