वेळीच सीपीआर मिळाल्यामुळे वाचले 46 वर्षीय स्वयंसेवकाचे प्राण*
*नवी मुंबई:* रसायनी रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती मानसिक तणावाखाली विद्युत खांबावर चढल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या व्यक्तीला सुरक्षितरित्या खाली आणण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कारवाईदरम्यान अनपेक्षित घटना घडली असून
याठिकाणी झालेल्या अपघातात बचावासाठी पुढाकार घेतलेल्या हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री. विजय भोसले यांना वीजेचा धक्का बसून जीभेला दुखापत झाली, धुरामुळे श्वसनमार्गाला इजा झाली, त्वचा भाजली तसेच मणक्याला व बरगड्यांना फ्रॅक्चर झाले व ते बेशुद्ध पडून त्यांचा श्वासोच्छ्वासही थांबला. त्यामुळे क्षणार्धात अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली आणि घटनास्थळी तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज निर्माण झाली. वेळीच सीपीआर देत रसायनी पोलीस स्टेशनजवळ जखमी झालेल्या हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक श्री. विजय भोसले यांचे प्राण वाचविण्यात मेडिकव्हर हॉस्पिटल्सला यश मिळाले आहे.
या अपघातात बेशुद्ध पडलेल्या श्री. भोसले यांचा श्वासोच्छ्वास थांबला असून यांनी या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हेल्प फाउंडेशनचे संस्थापक श्री. गुरुनाथ साठेलकर यांनी घटनास्थळी तात्काळ सीपीआर दिले, त्यामुळे श्री. भोसले यांचा त्यांचा श्वास पुन्हा पुर्ववत सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितले की, घटनास्थळी दिलेल्या सीपीआरमुळे रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाले.
मेडिकव्हर हॉस्पिटल्स हे आपल्या आपत्कालीन व अतिदक्षता सेवांच्या माध्यमातून समाजाला विश्वासार्ह आरोग्यसेवा देत असल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे.
