खांदा वसाहतीच्या विकासासाठी तरुण पिढी सक्रिय; प्रभाग क्रमांक १५ मधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने होणार विजयी
पनवेल दि.१३(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक १५ मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी प्रचारात सहभागी झाल्याने येथील चारही भाजप उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
या प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका कुसुम पाटील व युवा नेतृत्व म्हणून दशरथ म्हात्रे हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून येथील रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न या पूर्वीच नगरसेवकांनी सोडवला आहे. तर येणाऱ्या काळात खांदेश्वर मंदिराजवळील तलावाचे सुशोभीकरण तसेच त्या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या नागरिकांसाठी बॅडमिंटन कोर्ट उभारणे, खांदा वसाहतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध योजना उपक्रम या ठिकाणी राबवणार असे उमेदवार दशरथ म्हात्रे यांनी यावेळी सांगतले आहे. या मतदार संघात मोठ्या प्रमाणात तरुणांची फळी प्रचारासाठी रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे प्रचाराला एक वेगळी रंगत आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रसह्णत ठाकूर, अरुणशेठ भगत यांनी मोठ्या विश्वासाने मला ही निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. या संधीचे मी सोने करणार असून यापूर्वी सुद्धा मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होतो. पक्षाच्या विविध पदांमार्फत मी खांदा वसाहतीच्या लोकांसाठी कामे केली आहेत. त्या मतदारांना मी घरचा उमेदवार वाटत आहे;. त्याच प्रमाणे माझ्या बरोबर असणारे तीनही उमेदवार हे अनुभवी असल्यामुळे त्यांच्या कार्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत निश्चितच होणार आहे. त्यामुळे येत्या १५ तारखेला मतदार राजाने मतदानासाठी यावे व चारही उमेदवारांसमोरील कमळाचे बटन दाबून आम्हाला विजयी करावे असे आवाहन प्रभाग क्रमांक १५ चे उमेदवार दशरथ म्हात्रे यांनी केले आहे.
