पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी
पनवेल दि. ७ ( वार्ताहर ) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे .
प्रामुख्याने खांदा कॉलनी येथील प्रभाग 15 मधून महाविकास आघाडीचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे उमेदवार शिवाजी दांगट व पूजा जाधव तसेच महादेव वाघमारे, श्रुती बंडगर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याची पहावयास मिळत आहे कार्यकत्यांच्या बळावर सहा महिन्यांपूर्वीच शिवाजी दांगट यांची उमेदवारी घोषित झाली होती . शिवसेना शाखा येथे सामाजिक कामातून त्यांनी आपली उमेद दाखवली सर्वांना सांभाळून व सोबथ घेणारा नेता अशी त्यांची शाखेमध्ये प्रतिमा तयार झाली आहे त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे ते जनते मध्ये लवकर मिसळत आहे त्यामुळे जनतेने आपल्याला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन ते ठिकठिकाणी करताना दिसत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खांदा कॉलनीतल प्रत्येक शाखाप्रमुखानी त्यांच्या प्रचारासाठी झोकून दिले आहे त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडी उमेदवार शिवाजी दांगट यानी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पूजा जाधव यांनी सुद्धा आपला सामाजिक कार्याच्या आधारे घराघरांत त्याचे कौटुंबिक संबंध आहेत . तसेच त्यांनी मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता .
