शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या हत्येचा उरण मध्ये शिवसेनेने केला निषेध
पनवेल दि.०४(वार्ताहर): शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या हत्येचा उरण मध्ये शिवसेनेने निषेध केला आहे.
शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या हत्येचा शिवसेनेच्या कोटनाका राघोबा मंदिर उरण येथे जिल्हाप्रमुख येथे विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध करुन उरण पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेंद्र पाटील, रमेश म्हात्रे, चंद्रकांत पाटील, मेघाताई दमडे, सुनील भोईर, सुलेमान शेख समद भोंगले, मनोहर ठाकूर, सचिन पाटील, बेबीताई पाटील, योगेश वापर्डेकर, रवींद्र म्हात्रे, दशरथ चव्हाण, नफुज्जुल फुसाटे, मिरेंद्र शहारे, शाखा प्रमुख संदेश म्हात्रे, शाखा प्रमुख रफिक शेख, शाखा प्रमुख समीर केळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
