सामजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे यांना " दादासाहेब फाळके अवॉर्ड " जाहीर

सामजिक कार्यकर्ते निलेश सोनावणे यांना " दादासाहेब फाळके अवॉर्ड " जाहीर



पनवेल /प्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते  निलेश सोनावणे  यांना सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबाबद्दल   दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचा  '  दादासाहेब फाळके  अवॉर्ड  " जाहीर झाला असून  हा पुरस्कार  येत्या २५ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे  चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करण्यात येणार आहे.
गेली पंचवीस वर्षे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात निलेश सोनावणे यांनी भरीव काम केले आहे ,पर्यावरण ,आरोग्य ,कला क्रीडा ,शैक्षणिक , सांस्कृतिक यासह पत्रकारितेत ते गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत आपल्या लेखणीतून समाजातील पीडितांना  ते न्याय हक्क मिळून देण्याचे काम करीत आहेत नुकतेच  त्यांनी राजकीय क्षेत्रात  देखील पदार्पण केले असून लोकनेते  केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री  डॉ रामदासजी आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्ष पदी पक्ष श्रेष्टीनी त्यांची निवड केली  आहे  
विविध क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी जी जी पदे भूषविली त्या पदांना साजेसे काम करून आपल्या कामाचा  ठसा  उमटवला आहे रायगड नवी मुंबई पनवेल परिसरात त्यांनी आपली सामाजिक कार्याची चांगली छाप पाडली असून दलित आदिवासी, वंचित घटकांसाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत  आपल्या सामाजिक कामाचे योगदान दिले आहे .त्यांच्या या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत  दादासाहेब फाळके चित्रपट युनियन चे राष्ट्रीय  अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड जाहीर झाला असल्याचे  पत्र पाठवले आहे .