महेंद्रशेठ घरत यांचा कल्याण-गोवेली येथे कपिल पाटील यांनी केला सन्मान.

 महेंद्रशेठ घरत यांचा कल्याण-गोवेली येथे कपिल पाटील यांनी केला सन्मान





सिद्धिविनायक मंदिर आणि टिटवाळा येथे महेंद्रशेठ गणेशाच्या चरणी लीन!

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )उरण नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती.त्या अनुषंगाने उरण नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. महाविकास आघाडीला चांगले यश मिळू दे, असे गाऱ्हाणे गणरायाकडे त्यांनी त्यावेळी घातले होते. त्यानंतर त्यांनी उरणमध्ये मतदान केंद्रांना भेटी दिल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्याने आणि महाविकास आघाडीलाही चांगले यश मिळाल्याने महेंद्रशेठ घरत यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे मंगळवारी (ता. २३) सकाळी दर्शन घेतले.  
त्यानंतर ते कल्याण-गोवेली येथे धर्म जागरण सप्ताहाला उपस्थित राहून तेथे काल्याच्या कीर्तनात एक तास रमले. या सप्ताहाला हजारो भाविक उपस्थित होते. काल्याचे कीर्तन संपल्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महेंद्रशेठ घरत यांचा सन्मान केला. त्यानंतर महेंद्रशेठ घरत यांनी टिटवाळा येथील गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाचे प्रसन्न रूप पाहून ते काही क्षण निःशब्द झाले. दिनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला लाभू दे, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी मनोमन केली.