उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
21 नगरसेवक पैकी 12 भाजपचे तर 9 महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी.
पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सर्वत्र जल्लोष.
निवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी फटका तर महाविकास आघाडीला काही प्रभाग मध्ये नव्याने संधी.
उरण मध्ये घडला ' बदल '
जनतेला हवे होते परिवर्तन.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )उरण नगर परिषदेच्या निवडणुकीची निकालाची अनेक दिवसापासूनची प्रतीक्षा आता संपली असून निवडणूक निकाल आता जाहीर झाला आहे. उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( श्री शरदचंद्र पवार पक्ष )चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर या विजयी झाल्या आहेत.तर नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले भाजपच्या शोभा कोळी शाह, शिवसेना शिंदे गटाचे रुपाली तुषार ठाकूर, अपक्ष असलेले नसरीन इसरार शेख हे पराभूत झाले आहेत.तर 21 नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवार पैकी 12 नगरसेवक भाजपचे तर 9 नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत.
उरण नगरपालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत अटीतटीची झाली होती . निवडणूक काळात संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले होते.दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नागरिकांनी मतदान केले. उरण नगर परिषदेत एकूण 67.92 % मतदान झाले होते.काही अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले होते.मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे डोळे लागले होते .निकाल 3 डिसेंबर 2025 रोजी लागणार होता मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णया मुळे निकाल पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षे नंतर दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी उरण नगर परिषदेचा निकाल लागला आहे.उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा अशा एकूण 22 पदांसाठी निवडणूक संपन्न झाली आहे. नगराध्यक्षा पद महिला राखीव असल्याने सर्व पक्षांच्या गणितात मोठी उलथापालथ झाली होती.योग्य महिला उमेदवारांच्या शोधासाठी पक्षांना धावाधाव करावी लागली होती . या निवडणुकीत 13,311 पुरुष आणि 12,903 महिला असे मिळून 26,214 मतदार होते.
नगराध्यक्षा पद हे जनतेकडून थेट निवडून द्यायचे असल्याने मुख्य लढत अत्यंत चुरशीची बनली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( श्री.शरद पवार गट ), शेतकरी कामगार पक्ष, मनसे, शिवसेना ( श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) व इतर समविचारी पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना घाणेकर या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर मैदानात होत्या , तर भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा कोळी या कमळ या चिन्हावर उमेदवारी लढवली. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली ठाकूर हे धनुष्यबाण या निशाणीवर आणि एक अपक्षही रिंगणात असले तरी खरी लढत भावना घाणेकर व शोभा कोळी यांच्यातच झाली होती.उरणकरांच्या नजरा या दोन्ही महिला उमेदवारांच्या विजयाकडे खिळल्या होत्या .कोण नगराध्यक्ष बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता निकाल लागल्याने सर्व उमेदवारांचे निकालचे चित्र स्पष्ट झाले आहे.भाजप महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच खरी लढत झाली होती हे चित्र स्पष्ट झाले आहे.नगरसेवकांच्या 21 जागांवर महाविकास आघाडी व भाजप यातच मुख्य सामना झाला होता. प्रभाग 1 ते 9 मधून प्रत्येकी 2 नगरसेवक, तर प्रभाग 10 मधून 3 नगरसेवक निवडले गेले.प्रभागनिहाय मतदारसंख्या पाहिली असता प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1605, महिला 1706 एकूण 3311, प्रभाग 2 मध्ये पुरुष 1549, महिला 1613 एकूण 3162, प्रभाग 3 मध्ये पुरुष 1252, महिला 1168 एकूण 2420, प्रभाग 4 मध्ये पुरुष 1416, महिला 1321 एकूण 2737, प्रभाग 5 मध्ये पुरुष 1298, महिला 1268 एकूण 2566, प्रभाग 6 मध्ये पुरुष 1010, महिला 1049 एकूण 2059, प्रभाग 7 मध्ये पुरुष 1566, महिला 1388 एकूण 2954, प्रभाग 8 मध्ये पुरुष 955, महिला 893 एकूण 1848, प्रभाग 9 मध्ये पुरुष 1148, महिला 1145 एकूण 2293 आणि प्रभाग 10 मध्ये पुरुष 1512, महिला 1352 एकूण 2864 अशी मतदारांची आकडेवारी होती.या सर्व प्रभागांमध्ये चुरशीची लढत झाली होती.
नगरसेवक पदांच्या 21 जागांसाठीच्या सर्व प्रभागांत चूरशीचा सामना झाला होता. प्रभाग 1 मध्ये रजनी कोळी, प्रीती कोळी, जविंद्र कोळी, राकेश कोळी; प्रभाग 2 मध्ये रिबेका मढवी, रसिका मेश्राम, नंदकुमार लांबे, विक्रम म्हात्रे व अंजली खंडागळे; प्रभाग 3 मध्ये नम्रता ठाकूर, वंदना पवार, सुरेश शेलार, अमित म्हात्रे, तुषार ठाकूर व शेख खालीक; प्रभाग 4 मध्ये संदीप पानसरे, अतुल ठाकूर, हंसराज चव्हाण, रोशनी थळी, प्रमिला पवार व रुपाली ठाकूर; प्रभाग 5 मध्ये धनश्री शिंदे, नाहिदा ठाकूर, जसिम इस्माईल व अफशान मुकरी; प्रभाग 6 मध्ये स्नेहल पाटील, मंगेश कासारे, रीना पाटील व तनिषा पाटील; प्रभाग 7 मध्ये शाईस्ता कादरी, प्रार्थना म्हात्रे, रवी भोईर, शादाब शेख व अशमील मुकरी; प्रभाग 8 मध्ये पूर्वा वैवडे, विना तलरेजा, रोहित पाटील व विजय जाधव; प्रभाग 9 मध्ये गणेश पाटील, हेमंत पाटील, सायली पाटेकर व यशस्वी म्हात्रे; तर प्रभाग 10 मध्ये राजेश ठाकूर, ओमकार घरत, सायली म्हात्रे, कमल पाटील, दमयंती म्हात्रे व लता पाटील अशा 48 उमेदवारांनी व 1 नगराध्यक्ष असे एकूण 49 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या 49 उमेदवारांमध्ये भाजपाचे 21 उमेदवार,महाविकास आघाडी – 21 उमेदवार,शिवसेना शिंदे गटचे 5 उमेदवार,वंचित बहुजन आघाडीचे 1 उमेदवार,रिपब्लिकन पक्षाचे 1 उमेदवार उभे होते.
मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान संपन्न झाले असून दि. 21 डिसेंबर रोजी नगरपालिका कार्यालयात निकाल जाहीर झाला आहे.मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु झाली व 11:30 च्या सुमारास मतमोजणी संपली. मतमोजणी साठी एकूण 10 टेबल होते. प्रत्येक प्रभाग निहाय मतमोजणी टेबल होते. 10 प्रभाग साठी 10 मतमोजणी टेबल होते. मतमोजणी साठी एकूण 40 कर्मचारी कार्यरत होते.उरण मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही कडक होता.5 पीआय, 15 एपीआय, 106 पीएसआय, 49 वायरलेस कॉस्टेबल, 2 स्ट्राईकिंग कर्मचारी असा पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त उरण शहरात होता.मागील निवडणुकीतील सत्तासंतुलन लक्षात घेता यंदाची निवडणूक अधिक तापलेली आणि चुरशीची होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. नेतेमंडळी अगोदरच विशेष लक्ष देऊन सज्ज झाली होती.आता निकाल लागल्याने सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे.नगराध्यक्ष पदी भावनाताई विजयी झाल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
उरण नगर परिषदेत गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती. मात्र 2016 मध्ये युतीत फूट पडली. त्यामुळे 2016 च्या निवडणुकीत भाजपा विरोधात अखंड शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष अशी तिरंगी लढत झाली होती. यात भाजपाने आघाडी घेत स्वबळावर नगराध्यक्षपद व 18 नगरसेवकांपैकी 13 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर 2022 मध्ये मात्र शिवसेनेत फूट पडली.शिवसेनेचा शिंदे गट अस्तित्वात आला.त्यामुळे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गट हे दोन्ही पक्ष एकत्र होते. मात्र शिवसेना फुटीचा उरण शहरात कोणताही परिणाम झाला नव्हता.
उरण नगर परिषदेत, उरण शहरात उरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद असली तरी मात्र 2016 च्या निवडणुकीत नगरराध्यक्ष पदासाठी लढलेले तत्कालीन अखंड शिवसेनेचे उमेदवार गणेश शिंदे यांनी 2025 च्या उरण नगर परिषदच्या निवडणुकीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या निवडणुकीत आपली ताकद असतानाही उमेदवारी देता आलेली नाही. त्याला पर्याय म्हणून 2016 निवडणुकीत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उभे राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्या भावना घाणेकर यांना 2025 च्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली.मात्र मिळालेल्या या उमेदवारीचे भावनाताई घाणेकर यांनी संधीचे सोने केले आहे. भावनाताई यांनी करिष्मा करत आपली ताकद उरण नगर परिषद निवडणुकीत दाखवली आहे.
शिंदे सेनेचा फटका कोणाला ?
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाने या निवडणुकीत भाजपच्या विरोधात नगर परिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. भाजप आणि उबाठाच्या तुलनेत या पक्षाचा उरणमध्ये फारसा प्रभाव नाही. मात्र या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रूपाली ठाकूर या धनुष्य बाण चिन्हामुळे उबाठा गट, महाविकास आघाडी व भाजपलाही फटका बसला आहे.शिंदे सेनेचा सर्वाधिक जास्त फटका भाजपला बसला आहे.
कोट (चौकट ):-
कोणाला किती मते पडली याचा निकाल :-
शोभा कोळी शाह भारतीय जनता पार्टी मिळालेली मते - 7740,भावनाताई घाणेकर महाविकास आघाडी मिळालेली मते -9210, रुपाली तुषार ठाकूर शिवसेना शिंदे गट मिळालेली मते -593,नसरीन इसरार शेख अपक्ष मिळालेली मते 116, नोटा मते(वरील पैकी एकही नाही ) -206
विजयी उमेदवार - भावनाताई घाणेकर
============================== ==========
प्रभाग क्रमांक 1 अ
प्रीती साईनाथ कोळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मिळालेली मते -905, रजनी सुनिल कोळी भाजप मिळालेली मते -1365, वरील पैकी एकही नाही (NOTA ) मिळालेली मते -34
विजयी उमेदवार -रजनी सुनिल कोळी
============================== ==========
प्रभाग क्रमांक 1 ब
अनंत मधुकर कोळी शिवसेना मिळालेली मते 85, जयविंद्र लक्ष्मण कोळी भाजप मिळालेली मते 1404, राकेश नामदेव कोळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 771, वरील पैकी एकही नाही (NOTA) मिळालेली मते 44
विजयी उमेदवार -जयविंद्र लक्ष्मण कोळी
============================== ==========
प्रभाग क्रमांक 2 अ
रिबेका रविंद्र मढवी भाजप मिळालेली मते 1134,रसिका अजय मेश्राम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मिळालेली मते 991,वरील पैकी एकही नाही (NOTA) मिळालेली मते 45
विजयी उमेदवार - रिबेका रविंद्र मढवी
============================== ==========
प्रभाग क्रमांक 2 ब
अंजली तुकाराम खंडागळे वंचित बहुजन आघाडी मिळालेली मते 67, विक्रम राजेंद्र म्हात्रे( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मिळालेली मते 1081,नंदकुमार बालाजी लांबे भाजप 986,वरील पैकी एकही नाही (NOTA) मिळालेली मते 36
विजयी उमेदवार - विक्रम राजेंद्र म्हात्रे
============================== ==========
प्रभाग क्रमांक 3 अ
नम्रता प्रविण ठाकूर भाजप मिळालेली मते 676,वंदना विजय पवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 971,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 32
विजयी उमेदवार वंदना विजय पवार
============================== ==========
प्रभाग क्रमांक 3 ब
तुषार शंकर ठाकूर शिवसेना शिंदे गट मिळालेली मते 166,अमित हरिश्चंद्र म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 835,खालिक चाँद शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) मिळालेली मते 149, शेलार सुरेश वामन भाजप मिळालेली मते 505,वरील पैकी एकही नाही (NOTA) मिळालेली मते 24
विजयी उमेदवार अमित हरिश्चंद्र म्हात्रे
============================== ==========
प्रभाग क्रमांक 4 अ
हंसराज महादेव चव्हाण शिवसेना शिंदे गट मिळालेली मते 93, अतुल सुरेश ठाकूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 1383,संदीप शशिकांत पानसरे भाजप 493,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 17
विजयी उमेदवार -अतुल सुरेश ठाकूर
============================== ==========
प्रभाग क्रमांक 4 ब
रुपाली तुषार ठाकूर शिवसेना शिंदे गट मिळालेली मते 167,रोशनी सचिन थळी भाजप मिळालेली मते 632,प्रमिला संतोष पवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मिळालेली मते 1153, वरील पैकी एकही नाही (NOTA ) मिळालेली मते 34
विजयी उमेदवार- प्रमिला संतोष पवार
============================== ==========
प्रभाग क्रमांक 5 अ
नाहिदा ठाकूर इंडियन नॅशनल काँग्रेस मिळालेली मते 831,हिदा हमीद सरदार भाजप मिळालेली मते 795,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 60
विजयी उमेदवार- नाहिदा ठाकूर
============================== ==========
प्रभाग क्रमांक 5 ब
जसीम इस्माईल गॅस भाजप मिळालेली मते 1180,अफशान मुझम्मील मुकरी इंडियन नॅशनल काँग्रेस मिळालेली मते 447,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 59
विजयी उमेदवार - जसीम इस्माईल गॅस
============================== ==========
प्रभाग क्रमांक 6 अ
मंगेश लक्ष्मण कासारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मिळालेली मते 927,स्नेहल कासारे पाटील भाजप मिळालेली मते 655,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 20
विजयी उमेदवार - मंगेश लक्ष्मण कासारे
============================== ==========
प्रभाग क्रमांक 6 ब
तनिषा सागर पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 791,रीना निलेश पाटील भाजप मिळालेली मते 786,वरील पैकी एकही नाही( NOTA )मिळालेली मते 25
विजयी उमेदवार - तनिषा सागर पाटील
============================== ==========
प्रभाग क्रमांक 7 अ
शाईस्ता कादरी भाजप मिळालेली मते 873, प्रार्थना चेतन म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली मते 916,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 64
विजयी उमेदवार - प्रार्थना चेतन म्हात्रे
============================== ==========
प्रभाग क्रमांक 7 ब
भाईर रवि यशवंत भाजप मिळालेली मते 1001,मुकरी अशमील मोहम्मद अली शिवसेना मिळालेली मते 79,शादाब इकबाल शेख इंडियन नॅशनल काँग्रेस मिळालेली मते 732,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 41
विजयी उमेदवार - भोईर रवि यशवंत
============================== ==========
प्रभाग क्रमांक 8 अ वीणा राजेश तलरेजा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मिळालेली मते 458,वैवडे पूर्वा योगेश भाजप मिळालेली मते 815,वरील पैकी एकही नाही (NOTA ) मिळालेली मते 33
विजयी उमेदवार - वैवडे पूर्वा योगेश
============================== ==========
प्रभाग क्रमांक 8 ब
विजय दिलीप जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मिळालेली मते 361,ऍड. रोहित नितीन पाटील भाजप मिळालेली मते 916,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 29
विजयी उमेदवार - ऍड रोहित नितीन पाटील
============================== ==========
प्रभाग क्रमांक 9 अ
गणेश सदाशिव पाटील भाजप मिळालेली मते 1089,हेमंत नारायण पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 407,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 20
विजयी उमेदवार - गणेश सदाशिव पाटील
============================== ==========
प्रभाग क्रमांक 9 ब
सायली विशाल पाटेकर भाजप मिळालेली मते 1027,यशस्वी जयेंद्र म्हात्रे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 423,वरील पैकी एकही नाही( NOTA )मिळालेली मते 66
विजयी उमेदवार - सायली विशाल पाटेकर
============================== ==========
प्रभाग क्रमांक 10 अ
ओमकार विजय घरत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 757,राजेश मधुकर ठाकूर भाजप मिळालेली मते 972,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 33
विजयी उमेदवार - राजेश मधुकर ठाकूर
============================== ==========
प्रभाग क्रमांक 10 ब
कमल अशोक पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मिळालेली मते 780,सायली सविन म्हात्रे भाजप मिळालेली मते 929,वरील पैकी एकही नाही (NOTA )मिळालेली मते 53
विजयी उमेदवार - सायली सविन म्हात्रे
============================== ==========
प्रभाग क्रमांक 10 क
लता शेखर पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )मिळालेली मते 801,दमयंती वैभव म्हात्रे भाजप मिळालेली 904,वरील पैकी एकही नाही (NOTA )
विजयी उमेदवार - दमयंती वैभव म्हात्रे

