लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!

लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!



लोकशाही पत्रकार समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाने घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट. 




मा.आमदार बाळाराम पाटील, मा.आमदार मनोहर भोईर, काशिनाथ पाटील,बबन दादा पाटील, सुदाम पाटील, शिरीष घरत, योगेश चिले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे आदी मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.....!!





पनवेल दि.१७ (वार्ताहर): लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून पाहिलं जाणारं पत्रकारिता क्षेत्रात नव्या उमेदीने निपक्षपातीपणे काम करणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे. याच धर्तीवर लोकशाही पत्रकार समितीची स्थापना करण्यात आली असून सा.रायगड सम्राट चे संपादक शंकर वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. 

"असंघटित पत्रकारांनी लोकशाहीची मूल्य जोपासत असताना आपल्या लेखणीच्या शैलीने कोणावर अन्याय होणार नाही आणि झाल्यास त्याला वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाही अशा पद्धतीचं काम आपल्या पत्रकारितेच्या कौशल्यातून दाखवून द्यावी तसेच महिला पत्रकारांनीही दडपशाहीला न जुमानता समाजातील अन्याला वाचा फोडणे गरजेचे आहे" असं मत  वायदंडे यांनी यावेळी पत्रकारांना संबोधताना व्यक्त केलं. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सनिप कलोते, उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, उपाध्यक्ष गणपत वारगडा, उपाध्यक्ष अक्षय कांबळे, खजिनदार सुनील वारगडा, सह खजिनदार रोहिता साळुंखे, सचिव दिपाली पारसकर, सह सचिव प्रेरणा गावंड, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा गायकवाड, संघटक आशिष साबळे, सदस्य प्रकाश मत्रे, सदस्य जितेंद्र नटे, सदस्य अजय दुबे पद्माकर कांबळे आदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून, पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यात आली.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image