नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई

नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई



पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभागाने कारवाई करून जवळपास चार चाकी गाडीसह एकूण 2,58,120 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

      आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे प्रदीप पवार, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग रविकिरण कोले, यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग यांनी तळोजा पोलिस स्टेशन हद्दीत शिवम अपार्टमेंट सेक्टर 16, फेज 2, घोटगाव रोडवर तळोजा येथे दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचुन एका चारचाकी वाहनामध्ये बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या 144 बाटल्या व 01 चारचाकी वाहन असा एकूण 2,58,120/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे जयवंत भोईर यास ताब्यात घेतले त्याच्याकडे सदर मद्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचे मद्य हे जवळच असलेल्या फ्लॅटमधून आणले असे सांगितले त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या 250 बाटल्या असा एकुण रू.80,270/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 338390/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी जयवंत भोईर वय 38 वर्षे या इसमावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

       सदर कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल ग्रामीण विभाग अनिल जी. बिराजदार, दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1- अजित बडदे, दुय्यम निरीक्षक बीट क्र.3 सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गैनिनाथ पालवे, जवान नि वाहनचालक सचिन कदम, जवान ऋषिकेश भोगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास रविकिरण कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली अजित बडदे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग क्र.1 जि. रायगड हे करीत आहेत.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image