रोहा येथे पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
रायगड-अलिबाग,दि.19(जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग आणि एमबी मोरे फॉऊंडेशन धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.26 डिसेंबर 2025 रोजी एमबी मोरे फॉऊंडेशनचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रोहा-कोलाड रोड, एमआयडीसी धाटाव, ता. रोहा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अमिता पवार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी,आय.टी.आय.,डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.
रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.
