- पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – भाजप महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या विजयासाठी महायुती सज्ज

 - पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक –

 भाजप महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या विजयासाठी महायुती सज्ज 

















पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी आज नियोजित वेळापत्रकानुसार आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने दाखल केले. विविध प्रभागांतील भाजप महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रियेनुसार अर्ज सादर केले. 

पनवेल महापालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले.  या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय (आठवले गट ) महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत पुन्हा एकदा मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.  “विकास, स्थैर्य आणि विश्वास” या मुद्द्यांवर एकत्र आलेली ही महायुती पनवेलच्या राजकारणात निर्णायक ठरणार असल्याचे वातावरणातून स्पष्ट झाले. शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत उमेदवारांनी अर्ज दाखल केले, मात्र जनतेचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जोश लपून राहिला नाही. 

पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी भाजप महायुतीने सातत्याने काम केले आहे. शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत सोयीसुविधा, शिक्षण, विविध योजना, आरोग्य व पारदर्शक प्रशासन पनवेल महानगरपालिकेत पहायला मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पनवेलकर नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा महायुतीला निश्चित मिळणार आहे.  मागील कार्यकाळात भाजप महायुतीने पनवेल शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. दर्जेदार रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील सुधारणा, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच पारदर्शक प्रशासनामुळे पनवेल हे विकासाचे मॉडेल शहर म्हणून उदयास आले आहे. विरोधकांकडे केवळ आरोपांचे राजकारण असताना, महायुतीकडे विकासाचे ठोस काम आणि विश्वासार्ह नेतृत्व असल्याने पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असा नागरिकांकडून दुजोरा दिला जात आहे. 


-: उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :- 

प्रभाग क्रमांक १ 

 विजयश्री संतोष पाटील, लीना नंदकुमार म्हात्रे, नितेश बाळकृष्ण पाटील, संतोष बाबुराव भोईर 

प्रभाग क्रमांक २

 काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभणे, दिनेश रवींद्र खानावकर, कृष्णा सिताराम पाटील 

प्रभाग क्रमांक ३

 मंजुळा गजानन कातकरी, प्रिती फुलाजी ठाकूर, निर्दोष गोविंद केणी, विनोद कृष्णा घरत 

प्रभाग क्रमांक ४

प्रविण काळुराम पाटील, परेशा ब्रिजेश पटेल, अनिता वासुदेव पाटील, मधू पाटील 

प्रभाग क्रमांक ५

शत्रुघ्न अंबाजी काकडे, मिनल विजय पाटील, हर्षदा अमर उपाध्याय, प्रवीण रामजी बेरा 

प्रभाग क्रमांक ६

उषा अजित अडसुळे, नरेश गणपत ठाकूर, सोनल अजिंक्य नवघरे, समीर श्रीकांत कदम 

प्रभाग क्रमांक ७

अमर अरुण पाटील, मनाली अमर ठाकूर, प्रमिला रविनाथ पाटील, राजेंद्रकुमार दीपचंद शर्मा 

प्रभाग क्रमांक ८

बबन नामदेव मुकादम, रामदास शेवाळे, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरक 

प्रभाग क्रमांक ९

 महादेव जोमा मधे, प्रतिभा सुभाष भोईर, दमयंती निलेश भोईर, शशिकांत शनिवार शेळके 

प्रभाग क्रमांक १०

 रवींद्र अनंत भगत, सरस्वती नरेश काथारा, मोनिका प्रकाश महानवर, विजय खानावकर 

प्रभाग क्रमांक ११

नीलम मयूर मोहिते, प्रदिप गजानन भगत, चरणदीप बळदेव सिंग 

प्रभाग क्रमांक १२

  प्रभाकर कांबळे, विद्या प्रकाश तामखेडे, कुसूम रवींद्र म्हात्रे दिलीप बाळाराम पाटील,

प्रभाग क्रमांक १३

 रवींद्र गणपत जोशी, विकास नारायण घरत, हेमलता रवी गोवारी, शिला भाऊ भगत 

प्रभाग क्रमांक १४

 इकबाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रेय पाटील, रेणुका मयुरेश नेतकर 

प्रभाग क्रमांक १५

 एकनाथ रामदास गायकवाड, सीता सदानंद पाटील, कुसुम गणेश पाटील, दशरथ बाळू म्हात्रे 

प्रभाग क्रमांक १६

 संतोष शेट्टी, समिर बाळशेठ ठाकूर, राजेश्री महेंद्र वावेकर, कविता किशोर चौतमोल 

प्रभाग क्रमांक १७

 मनोज कृष्णाजी भुजबळ, प्रकाश चंदर बिनेदार, अस्मिता जगदिश घरत, शिवानी सुनिल घरत 

प्रभाग क्रमांक १८

 नितीन जयराम पाटील, ममता प्रितम म्हात्रे, प्रिती जॉर्ज, स्नेहा अनिल शेंडे 

प्रभाग क्रमांक १९

राजू चुन्नीलाल सोनी, दर्शना भगवान भोईर, रुचिता गुरुनाथ लोंढे, सुमित उल्हास झुंझारराव 

प्रभाग क्रमांक २०

 अजय बहिरा, श्वेता सुनिल बहिरा, प्रियांका तेजस कांडपिळे