शेकापच्या वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात;शेकापला आणखी एक जोरदार झटका
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल नहानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करून प्रवेश देण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, प्रभाकर जोशी, प्रल्हाद गायकर, सचिन वास्कर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांच्यासोबत ओवे, रांजणपाडा, ओवेकॅम्प, सेक्टर २७, सेक्टर ३४, सेक्टर ३५, भागेश्री सोसायटी, रोहींजण येथील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामध्ये जगदीश शेळके, लहू शेळके, महेंद्र शेळके, अशोक शेळके, कैलास शेळके, भावेश शेळके, कुणाल शेळके, सुभाष शेळके, सुनिल शेळके, हर्ष शेळके, समीर वाघमारे, शादाब शेख, तन्वीर शेख, आफताब शेख, सुफियान शेख, कैलास वास्कर, प्रभाकर वास्कर, महेश वास्कर, संतोष घरत, प्रशांत जोशी, शंकूनाथ गडगे, केतन म्हात्रे, पंढरीनाथ भाग्यवंत, चंदू भोपी, राजन चौधरी, खुटाराम चौधरी, प्रेमाराम चौधरी, बगदराम चौधरी, प्रकाश चौधरी, उमेशराम चौधरी, नेनाराम चौधरी, योगेश भीमराव जाधव, रोहित चव्हाण, दीपक भातोसे, सुशांत साळुंखे, गणेश जाधव, धनंजय साळुंखे, शिवराम जाधव, निलेश जाधव, मुकेश चौधरी, वरूण कांबळे, गौतम कांबळे, लखनभाई, छोटूभाई, कमलाकर पाटील, कुंदन घरत, सिद्धार्थ केणी, जतिन केणी, पियुष खुटारकर, कुणाल खुटारकर व समर्थकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. शेकाप ध्येय धोरणे विसरून इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन चालत आहे. एकेकाळी शानसे राहणाऱ्या शेकापला घरघर वाढली आहे. त्यामुळे शेकापने महाविकासआघाडी समोर एकप्रकारे नांगी टाकली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाराजीचा सूर उमटत आहे. शेकापची आजची अवस्था बिकट झाल्याने शेकापला इतर पक्षांच्या छायेत जगण्याची सवय झाली आहे आणि हीच गोष्ट कार्यकर्त्यांच्या संतापाचे कारण ठरत आहे.

