ऍड.मा.प्राचार्य पी.एल.गायकवाड यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

ऍड.मा.प्राचार्य पी.एल.गायकवाड यांना डॉक्टरेट पदवी प्रदान


पनवेल दि.२२ (संजय कदम) : नवीन पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते महात्मा फुले छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्याचे अभ्यासक माजी  प्राचार्य पी. एल गायकवाड यांना भारत मंच ट्रस्ट, संविधान हॉल, दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पी. एल. गायकवाड यांना माननीय सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल वाल्मीकी प्रसाद सिंग यांच्या शुभ हस्तेअमेरिका इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी च्या वतीने सामाजिक कार्याबदद्ल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. 

या प्रसंगी नॅशनल युथ अवार्डी डॉ. मनीष गवई, प‌द्मश्री बी. आर. इदाते, सुरेखा लामतुरे आदी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पी. एल. गायकवाड हे सु. ए. सो. चे ज्ञानवर्धिनी माध्यमिक विदयालय सावळे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत झाले आहेत. शाळा सांभाळत त्यांनी अनेक सेवाभावी संस्था व पदाधिकारी म्हणून काम पाहिले. यापुर्वी पी. एल. गायकवाड यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्र याच्यातून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय समाजसेवा केलेली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर अंदोलनामध्ये लाँग मार्चमध्ये सहभाग व अग्रेसर होते. तसेच म. फुले, छ. शाहुमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून वेळोवेळी नवीन पनवेल येथे व्याख्यानाचे आयोजन करीत असतात. सदर डॉक्टरेट पदवी मिळालेली वार्ता कळताच अनेक प्रतिष्ठीत मान्यवर व्यक्तीनी व समाज सेवा भावी संस्थानी अभिनंदन केले आहे.