कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
पनवेल/प्रतिनिधी,दि.३- आज मंगळवार दिनांक २/१२/२०२५ रोजी कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते करण्यात आले . या वस्तीगृह मध्ये बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालय, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व बबन दादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या कॉलेज च्या विद्यार्थांची दूरवरून येणाऱ्या राहण्याची सोय होत नव्हती. म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय संस्थेने स्वतःचे वस्तीगृह बांधून केली आहे . यावेळी उपजिल्हा अध्यक्ष संसंस्थचे संचालक रामदास पाटील , गणेश पाटील , कैलास पाटील , स्मित भोईर , अनुसया बबन पाटील ,विष्णू नामदेव म्हात्रे , बबन केणी ,शंकर सेठ ,विजया केणी ,बाबू पाटील विशाल केणी , मुरलीधर म्हात्रे , रमाकांत म्हात्रे , राजा खुटलें,बाळा म्हात्रे,अपर्णा भोईर , शिनगारे सर ,डॉ.कांबळे सर ,महाजन सर ,आदी उपस्तिथ होते.
