विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
प्रतिनिधी आवरे (मुकेश गावंड)
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बोधात्मक ,भावात्मक शारीरिक ,मानसिक, क्रीडात्मक विकास होय , खेल हे जीवनाचे अविभाज्यक अंग आहे खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगल्या पद्धतीने विकसित होत असतात आणि खेलामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीने राहत असते शारीरिक कसरती या आजच्या धकाधकीच्या जीवनात व्हायला हव्या कारण आज जीवन हे अगदी फास्ट होत चाललेले आहे सर्व रोगांचे मूळ जे आहे हे शरीराचे स्थूलपणा व असंतुलित आहार घेणे यासाठी व्यायाम व शालेय स्तरावर खेळाचे महत्व अधिक आहे आजचा विद्यार्थी हा ऑलिम्पिक स्तरावर चमकवा यासाठी प्राथमीक माहिती ही खेळविषयी असावी म्हणून शालेय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात आत्माराम ठाकूर मिशनचे जानकीबाई जनार्दन ठाकुर स्कूल आवरेचा वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पार पडले सदर प्रसंगी
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून स्वर्गीय स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांनी क्रिडानियो जण कस असावं हे सर याना अपेक्षित प्रथम दर्शनी क्रीडा प्रसंगीं तसेच क्रीडा ज्योत ही आवरे गावात बस स्थानक जवळ असणारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देत क्रीडा ज्योत ही आवरे बस स्थानक ते जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे क्रीडा मैदानावर उद्घाटन प्रमुख नागेंद्र होते सर व विद्यार्थ्यांच्या समवेत नेण्यात आली या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर संस्थेचे अध्यक्ष प्रतीक म्हात्रे सर सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर संस्थेचे सचिव वामन ठाकूर सर विद्यालयाच्या मुख्यद्यापीका सौ निकिता म्हात्रे मॅडम क्रीडा शिक्षक शुभम ठाकुर सर पालक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य शिक्षक वर्ग व व ज्या विद्यार्थ्यांसाठी ही क्रीडा स्पर्धा होणार आहे ते सर्व विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आजचा विद्यार्थी हा सर्व क्षेत्रात परिपूर्ण असावा मग अभ्यास असो अथवा मानसिक व शारीरिक खेल असो अथवा बुद्धीच्या चातुर्य असो किंवा अभ्यासक्रम किंवा हजर जबाबिपना यामध्ये विद्यार्थी अग्रेसर असावा असे मनोगत व्यक्त केले या क्रीडा महोत्सवात आपण हार असो अथवा जीत असो संयम कसा बालगावा हे सांगितलं शालेय क्रीडा स्तरावरील या क्रीडा सामन्यांमध्ये आपल्यामधील विशेष गुण शालेय स्तरावर दाखवावे असं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले अशा प्रकारे आज पासून आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकुर स्कुल आवरे येथे वार्षिक क्रीडा महोत्सव याचा उदघाटन सोहळा पार पडला व आज पासून सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या
