पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन

 पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम :  हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई  घरघंटी मशीन  

 


 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम

 

 

पनवेल (प्रतिनिधीपनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी  शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहेया योजनेअंतर्गत निवड झालेल्या  हजारहून अधिक पात्र लाभार्थींना सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी पासून शिलाई  घरघंटी मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

या  कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूररायगड जिल्हाधिकारी किशन जावळेजिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकरजिल्हा महिला  बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारीलोकप्रतिनिधीपदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघात घरगुती उद्योगांना नवी दिशा प्रदान करणारा ठरणार आहेमहिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीपासून समाजाच्या प्रगती पर्यंत मोठा सकारात्मक बदल घडतोत्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या दृष्टिकोनातून संकल्पना प्रत्यक्षात साकार केलीत्यांनी  संबंधित  प्रशासनाकडे  या संदर्भात पाठपुरावा केलात्या अनुषंगाने  प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलाहि योजना पारदर्शक पणे  करण्यासाठी  इच्छुक महिलांकडून घरघंटी किंवा शिलाई मशिन यासाठी महिलांचे अर्ज मागविण्यात आलेआणि त्या अर्जाची  संबंधित कागदपत्रांची शासकीय नियमाने पडताळणी करण्यात आलीत्यामधून निवड झालेल्या पात्र लाभार्थीना त्या वस्तूचे  आणि प्रमाणपत्राचे  वाटप करण्यात येणार आहेपनवेल मतदारसंघात सुरु होणारा हा उपक्रम महिला उद्योजकतेला बळ देणारा ठरणार आहेया उपक्रमामुळे पनवेल मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असूनया माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग प्रशस्त होत आहेयाचबरोबर पुढील टप्प्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार असूनइच्छुक महिलांनी आपली नोंदणी करून आगामी आर्थिक वर्षांत उपलब्ध होणाऱ्या निधीमधून त्यांना लाभ घेता येणार आहे.

 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image