पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून लग्नाचे मुहूर्त जास्त तर हॉलची संख्या कमी झाल्याने आता पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला पहिली पसंत सर्वजण देत आहेत .
लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची पंगत जमिनीवर त्यानंतर खुर्ची टेबलावर आता मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे . लग्न सराईच्या हटके पद्धतीत बुफे पद्धतीला मान देण्यात येत असल्याने ग्रमीण भागात सुद्धा पंगतीच्या जागी बुफे पद्धत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्याच प्रमाणे सभागृहासह ओपन लॉनवर शुभमंगलला पसंती मिळत आहे. त्या जोडीला संगीतमय मंगलाष्टकांची रेलचेल आहे. बाहेरील बाजूस फोटो सेक्शनसाठी विविध आकर्षक सजावट करण्यात येत असून लग्नसमारंभ हा इन्हेंट ठरत आहे. पूर्वी तुलसी विवाहनंतर खऱ्या अर्थाने लग्न सराईला सुरुवात होत असे व त्यानंतर बाजारपेठांमध्ये लग्रसराईचा साज चढू लागत असे . विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलकर बाजारपेठसह देण्याघेण्याच्या वस्तू साठी मुंबई-दादर, पुणे आदी ठिकाणी जात असल्याने वधूवर कडच्या मंडळींची गर्दी दिसून येत असे . यावर्षी १६ नोव्हेंबरपासून लग्राचा बार उडण्यास सुरुवात झाली असून ६ मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये २ व ५ रोजी मुहूर्त आहेत तर २०२६ हे वर्ष लग्न आणि शुभ कार्यासाठी खूपच चांगले असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. २०२६ या वर्षात एकूण ५९ शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे या शुभमुहूर्तावर लग्न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे . या लग्र सराईसाठी पनवेल परिसरातील सभागृहासह लॉन, हॉटेल व्यवसायिक सज्ज झाले आहेत. सद्य स्थितीत लग्राचा ट्रेंड बदलत चालल्याने लॉनच्या मोकळ्या जागेत सायंकाळी बहुतांशी लग्न उरकण्यात येत आहे. या ठिकाणी विविध पदार्थ याची रेलचेल असते मोठ्या शहरातील शाही विवाहाची परंपरा ग्रामीण भागात रुज्जू पाहत असल्याने या ठिकाणी राबणाऱ्या अनेक जणांना सुगीचे दिवस आले आहेत. लग्न सराईमध्ये जेवणावळीमध्ये पंजाबीसह चायनीज पदार्थाची रेलचेल आहे. त्याच्या जोडीला जेवणावळीनंतर पान-मसालासह आईस्क्रीम जोडीला असते मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा ही पद्धत जोर धरू लागली आहे. पंगत बसलाय व वाढायला जेवढा वेळ लागतो त्या पेक्षा कमी वेळात शेकडो माणसे बुफे पद्धतीत जेवण जेवून बाहेर पडत असतात त्याच प्रमाणे बसण्याची आकर्षक रचना असते बुफे कांऊटरवर हवे तसे घेता यते या मुळे ही पद्धत सर्वत्र दिसून येत आहे.सध्या लग्नाचे स्वरूप बदलते होत असून हटके लग्न सराई करण्याकडे अनेकांचा जोर आहे . त्यातच वेगवेगळे इव्हेंट ,संगीत ,संगीत पार्टी आदी प्रकार वाढत चालले आहेत . पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग मैदान तर तालुक्यातील राज रिसॉर्ट , विसावा रिसॉर्ट ,रिहाना फार्म हाऊस , काकाजींनी वाडी ,छाया रिसॉर्ट , आयुष्य रिसॉर्ट आदी कडे विवाह सोहळा करण्याकडे लोकांचा कल असून या ठिकाणी सहा सहा महिने अगोदरच बुकींग करावी लागत आहे .
कोट -
नाविन्यपूर्ण विवाह सोहळा करण्याकडे आता कुटुंबीयांचा कल असून, ग्राहकांच्या मागणी नुसार आम्ही त्यांना सर्वप्रकारे आवश्यक त्या सुखसोयी उपलब्ध करून देत असल्याने आमच्याकडे दरवर्षी विवाहासह इतर कार्यक्रम करण्यासाठी ग्राहकांचा वाढता कल असतो - संतोष उरणकर ,राज रिसॉर्ट
फोटो - राज रिसॉर्ट
