पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान

पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान 



 *प्रतिनिधी,खोपटे( गिरीश भगत)* पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे कारण या भूतलावर अनेकप्रकारची जैवविविधता आहे.भारतात सुमारे १४०० अशा पक्षांच्या प्रजाती आहेत या प्रजाती मात्र आजच्या  काळात पर्यावरणास गौण मानून मानवाच्या अति हव्यासापोटी निसर्गाची अपरिमित हानी होत आहे.त्यात अनेक प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. दिनांक ५ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत पक्षी सप्ताह साजरा केला जातो.महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी या पक्षांच्या विविध प्रजाती व  पक्षी प्रजाती व त्यांचे अस्तित्व हा अतिशय ज्वलंत विषय आहे त्या संबंधी त्यांची माहिती तसेच अशा प्रकारच्या पक्षांचे संवर्धन ही काळाची गरज आहे  यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) उरणचे सदस्य व वन्यजीव अभ्यासक श्री.निकेतन रमेश ठाकूर यांचे आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे मधील आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान चे आयोजन करण्यात आले  जानकीबाई जनार्दन ठाकूर चे सर्वेसर्वा  स्वर्गीय अशोक  ठाकूर सर यांचे स्वप्न होते की,आपला विद्यार्थी अभ्यासासमवेत  सर्वच क्षेत्रात अग्रेसर असावा, यासाठी म्हणजे त्याला या इंटरनेट च्या जगातील सर्वच  माहिती मिळावी व अशोक ठाकूर सर हे स्वतः निसर्गमित्र होते. त्यांच्या साठी अशोक ठाकूर सर यांनी आवरे येथील दक्षिणेकडे मोठे खार खोद काम करुन पक्षी व प्राणी यांना वर्षभर पिण्यास मुबलक पाणी मिळेल या उद्देशाने हे मौलिक कार्य केले.सदर व्याख्यानाचा लाभ हा जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला अतिशय अभ्यासपूर्ण व मजेशीर अशा पद्धतीने आपल्या सभोवताली असणारे पक्षी विश्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडले.तसेच विविध पक्षांचे चित्रफीत दाखवून,त्याबद्दलचे अद्यावत माहिती ही  निकेतन ठाकूर यांनीविद्यार्थ्यांना दिली तसेच सेमिनारच्या शेवटी एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) दाखवून, सदर कार्यक्रमचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.निकिता म्हात्रे तसेच विद्यालयातील शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.तसेच हा कार्यक्रम विद्यालयात राबविल्या बद्दल संस्थेचे सचिव विश्वस्त श्री वामन ठाकूर , अलका ठाकूर , प्रसाद ठाकूर सिंधू ठाकूर व आदिनाथ ठाकूर,रिना ठाकूर यांनी विशेष कौतुक केले आहे.

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image