मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका

मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका


पनवेल, दि.1 (संजय कदम) ः मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून 6 महिलांची गुन्हे शाखा पोलिसांनी सुटका केली आहे.

पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरपणाच सलुन आणि स्पा शॉप नंबर 01, देवीज्योती हॉटेलचे जवळ, जुहूनगर, जुहूगाव, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई येथे 6000/- रूपये घेवुन मसाजच्या नावाने तेथे असलेल्या महिलांकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत आहेत. वपोनि घोरपडे यांनी त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे बनावट ग्राहकास आरपणाच सलुन आणि स्पा येथे पाठवले. बनावट ग्राहकाच्या सांकेतीक इशार्‍यावरून पथकाने लॉजवर छापा टाकला. त्याठिकाणी 06 महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळुन आल्या. स्पाची महिला मॅनेजर असिमा रॉबिन घोष, वय 34 वर्षे, रा. रूम नंबर 03, साईकुंज सोसायटी, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई. मुळ रा. कोलकत्ता व तिचा पार्टनर पाहिजे आरोपी नर आलम शेख, रा. चेंबुर यांनी आपआपसात संगनमत करून 06 महिलांना बॉडी मसाज करण्याचे नावाने प्राप्त केल्या. त्या महिलांना वेश्या व्यवसायासाठी बनावट ग्राहकास दाखवून व्यवसायाचा मोबदला म्हणून 6000/- रूपये स्विकारले.

महिला आरोपी व पाहिजे आरोपी यांचे विरूध्द वाशी पोलीस ठाणे येथे गु. रजि.नं. 627/2025, भा.न्या.सं. कलम 143 (3), 3(5), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयातील अटक महिला आरोपीची दिनांक 04/12/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा तपास वाशी पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई सहा. पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, पोउपनिरी सरिता गुडे, पोहवा  मांडोळे, पोशि ठाकुर, पोशि चव्हाण, पोशि पारासुर, पोशि चव्हाण, पोहवा अडकमोल, पोना अनिता भोये तसेच चालक पोहवा मोहिते यांनी केली आहे.