भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
पनवेल, दि.०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या स्मारक ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, सहाय्यक संचालक (नगररचना) केशव शिंदे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त मंगल माळवे, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, कार्यकारी अभियंता विलास चव्हाण माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान महत्त्वपुर्ण होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करताना हा फक्त अभिवादनाचा क्षण नाही, तर एका क्रांतिकारी विचारवंताच्या आदर्शांना पुनःश्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे. असा महापुरुष पुन्हा होणे नाही असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
चौकट
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या सर्व शाळां मध्ये बालसभांचे व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सर्व शाळांमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सर्व शाळांध्ये निबंध ,भाषण ,चित्रकला, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच काही शाळांमध्ये नृत्य,गायन सादरीकरण करण्यात आले.
शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

