आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!

आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!



मुंबई/प्रतिनिधी,दि.१५-राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी  भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना निवडणूक 'राज्य निवडणूक समन्वयक' ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र जी चव्हाण व राज्य निवडणूक प्रभारी व महसूल मंत्री मा.ना.चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी ही राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती घोषित करत अनेक नेते व पदाधिकारी यांना निवडणुकी संदर्भातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यापूर्वी आमदार विक्रांत पाटील यांनी अशा अनेक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आणि निवडणुकीसंदर्भातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने या आगामी निवडणुकांमध्येही त्यांना ही महत्त्वपूर्ण 'राज्य निवडणूक समन्वयक' ही जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांचे एक विशेष महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही नियोजनबद्ध पद्धतीनेच लढत असते. आता आगामी निवडणुकांमध्ये विजय संपादित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. या राज्यस्तरीय निवडणूक संचालन समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव तथा विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांची नियुक्ती घोषित होतात शेकडो कार्यकर्ते व हितचिंतक यांनी शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले आहे आणि आ.विक्रांत दादा पाटील हे त्यांच्या संघटन कौशल्य व मेहनतीने या महत्वपूर्ण जबाबदारीला उचित न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image