नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा

नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा


"प्रवाशांच्या हिताची मागणी रेल्वे प्रशासनाकडे"

"रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय लवकरच जाहीर होईल"


       उरण परिसरातील प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या गर्दीच्या आणि असुविधेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ–उरण लोकल ट्रेन ९ डब्यांऐवजी १२ डब्यांची करण्यात यावी तसेच या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांना देण्यात आले.

या अगोदरही २७ नोव्हेंबर २०२४ रोजी याच विषयावर लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सदर विषयात रेल्वे प्रशासनाच्या सकारात्मक बैठका झाल्या. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ही मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

दररोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि नोकरदार वर्ग यांना गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल अपुऱ्या पडत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत तातडीची असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image