स्ट्रोकने पिडीत रुग्णांना मिळणार ‘गोल्डन अवर‘ मध्ये उपचार
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
*नवी मुंबई:* बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. स्ट्रोक म्हणजे पक्षाघात , याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे; ज्यावर वेळीच उपचार केला नाही, तर मृत्यूही होऊ शकतो. यावर योग्य वेळी उपचार केल्यास रक्तवाहिनी मधील अडथळा दूर केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊशकतो. परंतु त्यासाठी मेंदूच्या पेशी मृत होण्याआधीच जलद उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आणि लक्षात घेऊन नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने स्ट्रोक युनिटला सुरूवात केली आहे. *या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईचे आयपीएस आणि सहपोलीस आयुक्त श्री संजय येनपुरे उपस्थित होते.*
या युनिटमध्ये सीटी-एमआरआय चाचणी, थ्रोम्बोलिसिस आणि थ्रोम्बेक्टॉमी सारखी प्रगत तंत्रज्ञान, न्यूरो-आयसीयू आणि अनुभवी डॉक्टर आणि परिचारिकांची टीम यांचा समावेश आहे. नवी मुंबई, मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरात राहणाऱ्या रुग्णांना या सुविधेचा नक्कीच फायदा होईल.
मेंदूच्या एखाद्या भागात रक्त प्रवाहत अडथळा आल्यावर इस्केमिक स्ट्रोकतर मेंदूतील रक्तवाहिनी फुटली की हेमोरेजिक स्ट्रोक येतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॅाल, धूम्रपान, लठ्ठपणा, हृदयरोग आणि बैठी जीवनशैली ही स्ट्रोकची प्रमुख कारणं आहेत.
*नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसायन्ससचे संचालक डॉ. पवन ओझा सांगतात की,* स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अचानक अशक्तपणा किंवा सुन्नपणा (बहुतेकदा शरीराच्या एका बाजूला), बोलण्यात किंवा समजण्यात अडचणी, दृष्टी समस्या, चक्कर येणे किंवा अचानक तीव्र डोकेदुखी यांचा समावेश होतो. सांकेतिक भाषेत स्ट्रोकच्या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. याचा अर्थ (बॅलेन्स - संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ).
*डॉ. ओझा पुढे सांगतात की,* भारतात स्ट्रोक हे मृत्यू आणि अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे. बऱ्याचदा पक्षाघाताच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्यांना अशक्तपणा किंवा थकवा समजून त्यावर वेळीच उरचार केले जात नाही. यामुळे मृत्यू ओढवू शकतो किंवा अर्धांगवायू, बोलण्यात अडचणी येणे किंवा दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागू शकते. या युनिटच्या माध्यमातून केवळ उपचार न पुरविता समाजामध्ये याबाबत जागरूकता वाढवणे, वेळीच उपचार सुरू करणे आणि रुग्णांना जीवनाची नवी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. वेळीच उपचार केल्याने केवळ एखादयाचा जीव वाचत नाहीत तर त्याच्या जीवनाची गुणवत्ता देखील सुधारता येते.
*मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख संदीप जोशी सांगतात की,* या नवीन स्ट्रोक युनिटद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तमोत्तम रुग्ण सेवा पुरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला जाणार आहे. याठिकाणी रुग्णांना त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत याची खात्री केली जाईल.

