पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल युवा दिपावली अंकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल प्रतिनिधी
निलेश सोनावणे संपादित पनवेल युवा दिपावली अंकाचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले .पनवेल युवा चा दिपावली विशेष अंक दर्जेदार, उत्कृष्ट, वाचनीय असल्याचे सांगून सर्व स्तरातील वाचकांनी हा अंक जरूर वाचावा असे देखील आवाहन केले .
यावेळी पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे यांनी प्रास्ताविक केले गेली सतरा वर्षे पनवेल युवा दिवाळी अंकाची परंपरा सुरु असून १८ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन देखील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्तेच होत आहे .या वर्षीचा अंक अतिशय वाचनीय असून वाचकांनी तो जरूर वाचावा असेही निलेश सोनावणे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले .
या अंकाच्या प्रकाशन वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवदास कांबळे ,पनवेल महानगर पालिका रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे रायगड जिल्हा कार्यध्यक्ष अमोल इंगोले ,माजी नगराध्यक्ष संदीप पाटील ,भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक गणेश कडू, रिपाई पनवेल शहर कार्याध्यक्ष मोहन गायकवाड , पत्रकार संजय कदम ,संतोष आमले ,रवींद्र गायकवाड ,लालचंद यादव ,शंकर वायदंडे ,अण्णा आहेर ,राजेंद्र कांबळे,सुनील वारगडा, दीपक महाडिक ,केवल महाडिक, शैलेश चव्हाण आदी जण उपस्थित होते .
