मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात

मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात



 *गोल्डन अवरमध्ये मिळणार उपचार -आघातग्रस्त रुग्णांमधील मृत्युदराचे प्रमाण होणार कमी* 


 *नवी मुंबई:* अपघात झाला की सर्वप्रथम अपघातग्रस्तांना गरज असते ती तातडीच्या सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचारांची. त्यामुळे अपघातानंतरचा एक तास म्हणजेच गोल्डन अवर खुप मोलाचा ठरतो. या काळात वेळीच उपचार मिळाल्यास अपघातग्रस्ताचे प्राण वाचतात. *नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने शहरातील पहिले आणि सुसज्ज असे प्रगत ट्रॉमा सेंटर सुरू केले आहे.* 

ट्रामा केअर युनिटमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एकाच छताखाली सर्व उपचार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या युनिटमध्ये न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ऍनेस्थेसिस्ट, कुशल परिचारिका यांचा समावेश असणार आहे. तसेच ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागात सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारी साधनसामग्री येथे उपलब्ध असून रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंतची सगळी काळजी या युनिटमध्ये घेतली जाते.

मेडिकव्हर हॉस्पिटलने सीपीआर प्रशिक्षण आणि मेडिकव्हर लाईफ सेव्हर प्रोग्राम देखील सुरू केला आहे जेणेकरून गंभीररित्या जखमी रुग्णांना मदत करण्यासाठी नागरिकांनाही सक्षम केले जाईल.मेडिकव्हर हॉस्पिटलने रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी प्रगत ट्रॉमा सेंटर सुरू करत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमात रुग्ण, रुग्णवाहिका चालक, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसह १०० हून अधिक व्यक्तींनी सहभागी झाल्या होत्या.

 *मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे कॉम्प्लेक्स ट्रॉमा, पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स आणि इलिझारोव्ह सर्जन डॉ. नितीश अरोरा सांगतात की ,* अपघातग्रस्तांना तातडीच्या वैद्यकिय उपचारांची गरज असते. आघातग्रस्त रुग्णांमधील मृत्युदराचे प्रमाण देखील जास्त आहे. अपघातानंतर पहिल्या एक तासात म्हणजेच “गोल्डन अवर” मध्ये वैद्यकीय मदत दिली पाहिजे. *आपत्कालीन परिस्थितीत ८६५५८४५८६१* या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष आपत्कालीन टीम आणि ट्रॉमा केअरसाठी समग्र दृष्टिकोनासह, नव्याने सुरू केलेले अॅडव्हान्स्ड ट्रॉमा सेंटर नवी मुंबईकरांसाठी एक जीवनरक्षक केंद्र ठरणार *असल्याचे वक्तव्य मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी केले.* 

 *अपघातग्रस्त विकास गुप्ता यांनी* त्याच्यावरील आपत्कालीन प्रसंगाविषयी बोलाताना सांगितले की, मला आयुष्यात दुसरी संधी दिल्याबद्दल मी मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा कायम आभारी राहीन. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असताना ट्रॉमा सेंटरने प्रसंगावधान राखत त्वरीत उपचार केले. माझ्याप्रमाणेच, इतर अपघातग्रस्त रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावेत यासाठी मेडिकव्हर हॅास्पीटल सज्ज झाले आहे.