रोटरीचा सेवा प्रकल्प आणि सार्वजनिक प्रतिमेवर खारघर येथे परिसंवाद संपन्न

रोटरीचा सेवा प्रकल्प आणि सार्वजनिक प्रतिमेवर खारघर येथे परिसंवाद संपन्न


खारघर/प्रतिनिधी दि.६- खारघर येथे काल रविवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी रोटरी च्या डिस्ट्रिक्ट 3131 च्या भाग 1 चा सेवा प्रकल्प आणि रोटरीची सार्वजनिक प्रतिमा या विषयावर परिसंवाद संपन्न झाला.  या परिसंवादाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊन तर्फे करण्यात आले. आयोजन खूपच सुंदर ,नेटके  केले होते . कार्यक्रम चांगला पार पडण्यासाठी खारघर मिडटाऊन क्लबच्या सदस्यांनी खूपच परिश्रम घेतले.  सह संयोजक रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रियल टाऊन,  रोटरी क्लब पाताळगंगा आणि रोटरी क्लब खोपोली यांनी सहकार्य केले.  

या कार्यक्रमाला रोटरीचे जिल्हा गव्हर्नर रो. संतोष मराठे, जिल्हा सचिव  रो सुनील कुरूप प्रमुख पाहुणे लाभले. खारघर रोटरी क्लबचे अध्यक्ष रविकिरण आणि पूर्व अध्यक्ष डॉ सागर गुंडेवार  यांनी नेतृत्व केले.  या परिसंवादाला विविध रोटरी क्लबचे 115 मान्यवर सदस्य व काही मान्यवर पत्रकार संपादक उपस्थित होते. 

यामधे रोटरीच्या 7 सेवा विभागा मध्ये कोणकोणते प्रकल्प कसे करू शकतो , यावर रोटरीचे सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  रो सुमेधा भोसले , रो शोभा राव, रो संतोष परदेशी,रो विजय रायकर, रो अविनाश कोहिनकर ,रो राजकुमार सराफ यांनी अतिशय छान माहिती दिली. रो नितीन मुळे आणि टीम यांनी रोटरीचे प्रतिमा जनमानसात खूपच चांगली आहे , ती आत्ताच्या सोशल मीडियाच्या जगात सर्वदूर कशी पोहोचवता येईल , रोटरीचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल , त्यासाठी काय करावे याबाबत अतिशय उपयुक्त आणि सखोल माहिती दिली . रोटरी नेहमीच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तळागाळातील लोकांसाठी समाजसेवा करत असते.  ती नेटकेपणाने आणि प्रभावीपणाने कशी करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल या विषयाचे मार्गदर्शन रोटरी सदस्यांना मिळाले.  याप्रसंगी रोटरीला सहकार्य करणार्‍या निवडक पत्रकार आणि संपादकांचा सन्मान करण्यात आला. रो रितेश कुमार यांनी आभार प्रदर्शन केले नंतर सुग्रास भोजनाने  कार्यक्रमाची सांगता झाली .