मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
मुंबई/प्रतिनिधी,दि.१५- मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन रविवार दिनांक १२/१०/२०२५ रोजी शिरोडकर हायस्कूल परेल मुंबई येथे मंडळाचे अध्यक्ष प्रविण सावंत यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला या वेळी बौध्दचार्ये आयु. शिवराम सोनू सावंत यांनी बुद्ध पुजा पाठ व प्रवचन केले
या कार्यक्रमात गुणवंत विध्यार्त्यांचा सत्कार करण्यात आला व मुंबई पालिकेतून सेवा नेवृत्त झालेले आदरणीय प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रविण सावंत यांना युवक आधार महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात छोटा मुलगा सौर्य रमेश सावंत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्त भाषण केलं या कार्यक्रमाला प्रमोद सावंत, धर्मदास सावंत यांनी सुद्धा मार्गदर्शन केले मंडळाचे चटणीस रमेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले प्रदीप सावंत यांनी प्रस्तावना केली मंडळाचे खजिनदार विकास सावंत व उपाध्यक्ष दिलीप सावंत व सर्व कार्यकर्ते सभासद यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खुप मेहनत घेतली या वेळी साठरे ग्रामपंचायत सदस्य जयंनंद सावंत उपस्थित होते कार्यक्रमा वेळी ऑर्केस्ट्रा बोधिसत्व यांनी बुद्ध भिम गीतांचा कार्यक्रम सादर केले