कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन

 कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन




पनवेल: कायद्याबद्दल अज्ञान असणे हाच मुळात मोठा गुन्हा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थितज्ज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांनी केले. तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी कान टवकारले होते…. जेष्ठ पत्रकार कांतीलाल कडू संपादित दैनिक निर्भीड लेखच्या २९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन डॉ. म्हात्रे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कोर्टाच्या कामनिमित्त जावे लागल्याने न्यायालयाचा परिचय झाला आणि एक दिवशी न्यायाधीशांनी मला कायद्याविषयी विचारले… संवाद झाला. परंतु, न्यायाधिशांनी त्यावेळी सांगितले की, कायद्याविषयी अज्ञान असणे हाच मुळात मोठा गुन्हा आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
गेल्या तीस वर्षापासून माझी आणि कांतीलाल कडू यांची मैत्री आहे. त्या मैत्रीनेच मला इथे खेचून आणले, असा मैत्रीचा भावनिक पदरही डॉ. म्हात्रे यांनी हळूवारपणे उलगडून दाखविला.
कायद्याविषयक दिवाळी अंक काढून कांतीलाल कडू यांनी मैलाचा दगड पार केला आहे. आजकाल सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठांची मोठी फसवणूक होत असल्याच्या गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यावरही कांतीलाल कडू यांनी विशेष अंक प्रकाशित करावे, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी कडू यांना डॉ. नितीन म्हात्रे यांनी प्रेमाने आलिंगन दिले.
एम. जी. एम. हॉस्पिटल आणि कॉलेज रिसर्च सेंटरच्या अधिष्ठात्या निर्मला कासेकर, शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, ब्लॅक पँथरचे नेते जगदीश गायकवाड, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे, उद्योजक विजय लोखंडे, सरकारी वकील आणि कविवर्य एड. वाय. एस. भोपी, ज्येष्ठ संपादक सुनील पोतदार, रमेश भोळे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर त्यांच्या समवेत एड. प्रफुल्ल म्हात्रे आणि हॉटेल व्यावसायिक सुरेशशेठ फडके उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांमध्ये….
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले. त्यांनी व्यासपीठावरील उपस्थितीचा अचूक अंदाज घेत विनोदी शैलीतून शब्दांचे मोठ्या आवाजाचे फटाके फोडले. त्यांच्या भाषणावर दिवाळीच्या फटाक्यापेक्षा जास्त आवाजाच्या टाळ्या पडल्या… पोलिस उपस्थित नसल्याने उपस्थितांच्या खळखळून हसण्याचा आणि टाळ्यांचा डेसिबल मोजता आला नाही.
तितक्याच उत्कट कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन अभय पै यांनी करून रंगत आणली. उपस्थितांचे आभार सरकारी डॉक्टर आणि कविवर्य राजेंद्र राठोड यांनी मानले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाशशेठ म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल ढवळे, समाजसेवक धर्माशेठ भोईर, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख माधुरी गोसावी, पनवेल अर्बन बँकेचे माजी संचालक भाजप नेते हेमंत डुकरे, शहरचिटणीस नंदकिशोर भोईर, अनिल कदम, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चंद्रशेखर जळे, काँग्रेसचे नेते आल्हाद पाटील, महावितरण अभियंता आणि लेखक संजय पाटील, समाजसेवक अजित म्हात्रे, काँग्रेस नेत्या माया अहिरे, समाजसेवक भूषण भोईर, महाराष्ट्र डॉक्टर काँग्रेस सेलचे उपाध्यक्ष डॉ. अमित दवे, आयुर्वेदाचे प्रचारक गौरव दवे, कवी संजय गुरव, अलोक सापने, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय जाधव, काँग्रेसचे नेते जसविंदरसिंग सैनी, मल्लिनाथ गायकवाड, विखे हायस्कूलचे संचालक आनंद धुळे, ज्येष्ठ गायिका मंजुषा कदम, कवी आणि कलावंत शुभांगी मुंबईकर-पाटील, शिवाजी देशमुख, शेकाप नेते बाबुशेठ जाधव, फार्मसीचे व्याख्याते संतोष घोदिंडे, आदईचे माजी सरपंच रमाकांत गरुडे, शिवशाहीर विवेक भाेपी, अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे कोकण दिंडी प्रमुख पुंडलिकबुवा फडके, समाजसेवक संतोष मंजुळे, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, हरहुन्नरी कलावंत विनायक जोशी, रामदास म्हात्रे, गणेश मूर्तिकार नवनाथ, भाजप नेते विजय काळे, राज्य शासनाचे निवृत्त उपसचिव प्रमोद कडवे, मुरलीधर शहासने, पत्रकार वैभव गायकर, कुणाल लोंढे, संतोष सावंत, रवी गायकवाड, दीपक घरत, वसंत जाधव, अजय भोपी, शेखर भोपी, शैलेश जोशी, गोविंद जोशी, प्रा. प्रभाकर घुले, गणेश बडगुजर, रत्ना बडगुजर, विजय शेळके, सुभाष पाटील, राेहित गवते, वैभव जाेशी, अश्विनी भोसले, सोनल वरदे, सविता शेंडे, निशा पाटील, विनय म्हात्रे, मोरेश्वर घरत, नितीन मढवी किरण करावकर, सचिन पाटील, राकेश केणी, प्रिन्स कोळी, वसंत ठाकूर, अजय दुबे, िनलेश काकडे, मारूती शेळके, महादूशेठ पाटील, भूषण साळुंखे, निलेश पाटील, हरेश पटेल, सुरेश भोईर, शरद कोकणे, संतोष शुक्ला, डॉ. हेमंत पाटील, गौरव भगत, भावेश पाटील, विवेक भावसार, तेजस म्हस्कर तसेच, कांतीलाल कडू यांचे वर्गमित्र नरेश पाटील, विजय खुटारकर, प्रदीप खानावकर, सुरेखा खानावकर, कविता म्हस्कर, शंकर म्हस्कर, समीर गावडे, मंगेश ठकेकर अादी मान्यवर उपस्थित हाेते.