ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
ठाणे/प्रतिनिधी,दि.१४-"जनसभा" वृत्तपत्राचा,"देव,देश आणि धर्म" हा १५ वा दिवाळी विशेषांक ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २४ चे माजी नगरसेवक सन्माननीय जितेंद्र पाटील आणि 'जय गिरनारी मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश भाई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी "जनसभा"चे उपसंपादक सन्माननीय सयाजी सुतार हे उपस्थित होते.ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपसंपादक सयाजी सुतार यांचा दांडगा जनसंपर्क असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत येथील जनतेला "जनसभा"च्या माध्यमांतून योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यास मदत होणार असून आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्यांसाठी प्रिंट,दृकश्राव्य तसेच डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
"जनसभा"चा,"देव,देश आणि धर्म"हा १५ वा दिवाळी विशेषांक प्रकाशित करून उपस्थित मान्यवरांना भेट दीला,त्याप्रसंगी विद्याधन क्लासेसचे संस्थापक श्री.चौधरी सर,विटावा येधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जितेंद्र गवते साहेब,विटावा प्रभाग क्रमांक २४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पद्माकर पाटील साहेब, पश्चिम महाराष्ट्र रहिवासी विकास संस्थेचे मान्यवर पदाधिकारी,शिवतेज प्रतिष्ठान विटावाचे सन्माननीय पदाधिकारी वर्ग, तसेच गुरूकुल क्लासेसचे संस्थापक सन्माननीय साकोरे सर,श्री.माऊली सेवाभावी संस्था विटावाचे सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर या परिसरातील सुप्रसिद्ध वकील श्री.निलेश गायकवाड आणि श्री.मुक्तादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नवनीत सिनलकर यांचा समावेश आहे.





