८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
*७ आठवडे एनआयसीयुमध्ये केले उपचार*
*नवी मुंबई:* प्रसूतिपूर्व गुंतागुंतीमुळे ४१ वर्षीय महिलेची मुदतपूर्व प्रसूती करावी लागली. अवघ्या २८ व्या आठवड्यात बाळाचा जन्म झाला. त्याचे वजन केवळ ८०० ग्रॅम होते. मुदतपूर्व जन्म असल्याने त्या बाळाला अनेक शारीरिक समस्या जाणवत होत्या. या बाळावर खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले असून डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर त्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी ठरली.
खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ७ आठवडे उपचार घेतल्यानंतर या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. बाळाला गंभीर श्वसन सिंड्रोम, सेप्सिस, श्वसनक्रियेत अडथळे येणे, अशक्तपणा, चयापचय समस्या तसेच हाडांचा आजार आणि ब्रोन्कोपल्मोनरी डिस्प्लेसिया (बीपीडी) यांचा सामना करावा लागला. मेडिकव्हर हॉस्पिटलचे नवजात शिशु तज्ज्ञ आणि एनआयसीयू इन्चार्ज डॉ. तन्मेष कुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली टीमने ही गुंतागुंतीची केस हाताळली. आज हे बाळ सामान्य श्वासोच्छवास करत असून स्तनपानाचाही स्विकार करत आहे त्याच्या वयानुसार विकासाचे टप्पे गाठत आहे.
खारघर येथील ४१ वर्षीय रहिवासी श्रीमती वृषाली पवार( * रुग्णाचे नाव बदलले आहे) यांनी १४ ऑगस्ट २०२५ रोजी अकाली बाळाला जन्म दिला. गंभीर प्रीक्लेम्पसिया आणि मागील सिझेरियनमुळे तसेच हाय रिस्क प्रेग्नेन्सीमुळे २८ आठवड्यातच अकाली प्रसुती करण्यात आली. बाळाच्या हृदयाची गती प्रति मिनिट १०० बीट्सपेक्षा कमी आणि रक्त चाचण्यांमध्ये तीव्र श्वसन विकार आढळून आल्याने बाळाला त्वरीत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
*मेडिकव्हर हॉस्पिटलचे नवजात शिशु तज्ज्ञ आणि एनआयसीयू इन्चार्ज डॉ. तन्मेष कुमार साहू सांगतात की,* काही तासांतच बाळाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) असल्याचे निदान झाले, जो अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये फुफ्फुसाचा एक गंभीर आजार आहे. बाळाला त्याकरिता विशेष थेरपी देण्यात आली, यात एक औषध जे थेट फुफ्फुसांमध्ये दिले जाते जेणेकरून त्यांना ऑक्सिजन क्षमता वाढविण्यास आणि सुधारण्यास मदत होईल. बाळाला दीर्घकालीन फुफ्फुसाच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे दिसली म्हणून, क्लिनिकल पुराव्यांनुसार, स्टिरॉइड थेरपी 10 दिवसांसाठी सुरू करण्यात आली.
*डॉ. साहू पुढे सांगतात की,* एनआयसीयूमध्ये असताना बाळाला सेप्सिस देखील झाला आणि त्याच्यावर प्रगत अँटीबायोटिक्सचा उपचार करण्यात आला. त्याला रक्त संक्रमणांची आवश्यकता होती आणि चयापचय समस्या, हाडांचे आजार, कावीळ आणि स्तनपानाकरिता त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले गेले. बाळाच्या पोषणाकरिता टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशन (टीपीएन) ने सुरूवात झाली आणि हळूहळू स्तनपानास सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसापासून कांगारू मदर केअर (केएमसी) सुरू केले, ज्याने बाळाच्या विकासात्मक आणि भावनिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. कालांतराने, ४२ व्या दिवसापर्यंत बाळाला ऑक्सिजन सपोर्टवरुन काढण्यात आले आणि ४५ व्या दिवसापर्यंत त्याने तोंडावाटे आहार देण्यात आला आणि बाळाच्या आरोग्याबाबत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. उपचाराच्या ९ व्या दिवसापर्यंत, बाळाला श्वसनाचा आधार पूर्णपणे बंद करावा लागला आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीरित्या घरू सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिरावली होती व तो सामान्यपणे स्वतः श्वास घेत होता. नियमित फॉलोअपने बाळाची वाढ, हाडांचे आरोग्य आणि विकासाचे निरीक्षण केले जाईल. संसर्ग रोखणे, योग्य पोषण सुनिश्चित करणे आणि बाळाच्या वाढीला पाठिंबा देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
आमचे बाळ अकाली जन्मल्याने ते अशक्त होते. सुरुवातील त्याची प्रकृती पाहून आम्हाला आमचे बाळ की वाचेल की नाही याची भीती वाटली. त्याला अशा अवस्थेत पाहणे आमच्यासाठी खुप त्रासदायक होते. परंतु मेडिकव्हरमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी हार मानली नाही. त्यांनी आमच्या बाळाला नवे आयुष्य मिळवून दिले अशी प्रतिक्रिया बाळाची आई श्रीमती वृषाली पवार यांनी व्यक्त केली.
