यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
पनवेल (प्रतिनिधी) दिनांक : ७ नोव्हेंबर २०२५-युथ महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिरिजा फाऊंडेशन आश्रम येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी सहा वाजता झालेल्या या कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. दिपाली पारसकर यांनी वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा मार्ग निवडत समाजासाठी काहीतरी करण्याचा आदर्श घालून दिला आहे.
दिपालीताई पारसकर यांचे सामाजिक जाणिवेतून घेतलेले हे पाऊल सर्वत्र कौतुकास्पद ठरले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला गिरिजा फाउंडेशन च्या हर्षदा मॅडम, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील,जीवनज्योत वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीदेवी भुसने, एस. के एन्टरप्राइजेस चे मालक विजय कलोते. खुशी मॉड्युलर इंटेरियर चे मालक अजय दुबे, शिवसेना नेरे विभाग प्रमुख विद्याधर यशवंत चोरघे, पत्रकार गणपत वारगडा, सुनील वारगडा, सनिप कालोते, आदी मान्यवर उपस्थित होते.

