"वंदे मातरम्" गीताला १५० वर्षे – खारघरमध्ये सामूहिक गीत सादरीकरण
खारघर/प्रतिनिधी दि.८-‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर येथे भव्य सामूहिक गीत सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच खारघर मंडल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत समूहात सादर केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीतील मातृभूमीप्रेम यावर आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला भाजपा उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, भाजपा खारघर मंडल अध्यक्ष प्रविण पाटील, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, सरचिटणीस ऍड. नरेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष समीर कदम, तसेच किरण पाटील, नीलेश बाविस्कर, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, कीर्ति नवघरे, संध्या शारबिद्रे, संजय घरत,निर्मला यादव, प्रिया दळवी, जुमा चक्रबर्ती, रजनी शर्मा, दुर्गा अंजुरे, सविता घाटोले, राजवंत रायत, त्रापति चोवारे, मीनाक्षी अंथवाल, प्रवीण बेरा, आदित्य हातगे, राहुल शिंदे, रामचंद्र पाटील, संजय शर्मा, आनंद ज्ञाने, सुरेश कुमार, सर्जेराव मेंगाणे, विश्वनाथ इंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’ या गीताने दिलेल्या देशभक्तीच्या संदेशाचा पुन्हा एकदा सन्मानपूर्वक उच्चार केला आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प दृढ केला.

