राष्ट्रीय दिव्यांगजन संस्थेमध्ये राष्ट्रीय एकता दिनाचे मोठ्या दिमाखात साजरीकरण

राष्ट्रीय दिव्यांगजन संस्थेमध्ये राष्ट्रीय एकता दिनाचे मोठ्या दिमाखात साजरीकरण



नवी मुंबई/प्रतिनिधी,दि.३१-लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र, नवी मुंबई येथे “एक भारत, आत्मनिर्भर भारत” या विषयावर राष्ट्रीय एकता दिन शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यामधून एकता, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय बांधिलकीचा संदेश देण्यात आला.या विशेष कार्यक्रम डॉ. रवी प्रकाश सिंग (प्रभारी अधिकारी, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता.

         माननीय डॉ. रवी प्रकाश सिंग यांनी सर्व उपस्थितांना एकतेची शपथ दिली आणि त्यांच्या शुभहस्ते “रन फॉर युनिटी” या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन झाल्यानंतर, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.रॅलीदरम्यान “एक भारत, श्रेष्ठ भारत” या विषयावर घोषणाबाजी करण्यात आली आणि एकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला.या रॅलीमध्ये संस्थेतील बौद्धिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक, इतर शाळांतील दिव्यांग विद्यार्थी, तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी, व्याख्याते आणि कर्मचारीवर्ग यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.रॅलीचा समारोप लेवा पाटीदार भवन, खारघर सेक्टर 5 येथे झाला.या ठिकाणी लेवा पाटीदार भवन ट्रस्ट चे माननीय महादेवभाई पटेल, निलेशभाई पटेल, कैलाशभाई पटेल (विश्वस्त) आणि मनाभाई पटेल (भवन व्यवस्थापक) हे उपस्थित होते.

       कार्यक्रमादरम्यान डॉ. रवी प्रकाश सिंग यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकतेची शपथ घेतली आणि निपिड दिशा या उपक्रमा अंतर्गत पुस्तके संस्थेतील विशेष मुलांना वितरित करण्यात आले.तसेच, लेवा पाटीदार भवन ट्रस्ट च्या वतीने सर्व सहभागींसाठी नाश्ता आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून एकता, सशक्तिकरण आणि सामाजिक समावेश या मूल्यांचा प्रभावी संदेश दिला.कार्यक्रमाचे समन्वयन श्री. ज्ञानेश्वर सावंत आणि सौ. अनुषा संपत (व्याख्याता, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई) यांनी केले.

        या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व मान्यवर, कर्मचारीवर्ग, प्रशिक्षणार्थी आणि सहभागी यांचे मनःपूर्वक आभार!






Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image