कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय

कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय 


पनवेल दि.०२(वार्ताहर): कामोठे पोलिसांच्या तपासावर  आम्हाला पूर्व विश्वास असून ते दागिने चोरणाऱ्या आरोपींचा शोध लावलीत असे प्रतिपादन कामोठे वसाहतीमध्ये राहणाऱ्या दिघे कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.  

        कामोठे वसाहती मधील गिरीजा सोसायटी प्रतीक जेम्स मध्ये राहणाऱ्या सविता म्हस्कर यांच्या घरातील ४० दिवसांपूर्वी लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस  गेले होते. या चोरी संदर्भात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये त्यांच्या घरा समोर राहणाऱ्या दिघे कुटुंबियांवर संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात दिघे कुटुंबीयांनी आपली बाजू मांडताना आज पत्रकार परिषद घेत  म्हस्कर कुटुंबीयांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्या कुटुंबियांसोबत आमचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबीक संबंध होते या संबंधामुळे त्यांनी त्यांच्या घराच्या चाव्या आमच्याकडे अत्यावश्यक वेळेसाठी ठेवत होते.त्यामुळे सुद्धा त्यांचे म्हणणे आहे की चोरी आम्ही केली असावी. मात्र चोरी झाल्यापासून आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. त्यांनी या पूर्वी त्यांच्या कडील सोन्याचे दागिने आम्हाला दाखवले होते. परंतु या चोरी  संदर्भात आमचा कोणताही संबंध नाही आहे. पोलीस ठाण्यास तक्रार करण्यास आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. गेल्या महिना भरापासून पोलिसांच्या चौकशीला आम्ही  सामोरे जात आहोत. आमचे सीसीटीव्ही फुटेज, बँक खाते व आवश्यक असणाऱ्या सर्व माहिती आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिल्या आहेत असे शंतनू दिघे व मोनिका दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जाणीव पूर्वक आम्हाला या चोरीच्या प्रकरणात गोवण्याचा या सोसायटीमधील काही जणांचा डाव आहे. नुकतेच सोसायटीची निवडणूक पार पडून त्यात मी अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तसेच आमचे पॅनल सत्तेत आले. याचा काही जणांना राग असून त्या संदर्भात त्यांनी आम्हाला धमक्या सुद्धा दिली आहेत अशी माहिती मोनिका दिघे यांनी यावेळी दिली. म्हस्कर कुटुंबियांना पुढे करून आमच्यावर चोरीचा आळ सोशल मीडियाद्वारे घातला जात आहे. तसेच आमच्या दोघांच्या नोकरीच्या ठिकाणीसुद्धा आमची बदनामी  केली जात आहे. परंतु या सर्व प्रकारामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नसल्याने कामोठे पोलीस लवकरच मुख्य आरोपींना गजाआड करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्यानंत आम्ही आमच्या मानहानी प्रकरणी गुन्हा दाखल करणार आलस्याचे सुद्धा दिघे कुटुंबीयांनी सांगितले.


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image