महापालिका मुख्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने अभिवादन
पनवेल, दि.7 : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयुक्त मंगेश चितळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, लेखा परिक्षक निलेश नलावडे, उप लेखापरिक्षक संदिप खुरपे, जनसंपर्क अधिकारी नितिन साके, तसेच राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष शरद कांबळे, उपाध्यक्ष कैलास सोळंकी, कार्याध्यक्ष प्रकाश गायकवाड,महासचिव सतिश चींडीलिया, सचिव सागर खरारे, कोषाध्यक्ष भावेश चंदने, सहसचिव गुरूनाथ भगत, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख किर्ती महाजन, महापालिका अधिकारी व कर्मचारी महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे सदस्य, जय महाकाली मित्र मंडळाचे सदस्य, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या.