महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तात्काळ लाभ द्या- माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी
पनवेल (प्रतिनिधी ) पनवेल महानगरपालिका मधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती योजनेचा तात्काळ लाभ देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांनी अनेक वर्षांपासून इमाने इतबारे सेवा बजावली आहे. शासनाच्या धोरणानुसार (आश्वासित प्रगती पदोन्नती योजना) १० वर्षे, २० वर्षे, ३० वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर लागू असतानाही प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांच्या सेवेत उत्साह टिकवून ठेवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सदर योजना तात्काळ राबविणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन सदर कर्मचाऱ्यांना आपल्या केलेल्या सेवेचा योग्य तो मोबदला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे कामगारांच्या बाबतीत या महत्वपूर्ण विषयावर लक्ष केंद्रित करून महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती पदोन्नती (१० वर्षे, २० वर्षे व ३० वर्षे) योजनेचा लाभ लवकरात लवकर देण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केली आ
हे.