पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस पंधरवड्यानिमित्त खारघर येथे मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस पंधरवड्यानिमित्त खारघर येथे मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 




खारघर/प्रतिनिधी,दि.४-पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवस पंधरवड्यानिमित्त खारघर येथे मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अटल फाउंडेशन व भाजपा खारघर यांच्या पुढाकाराने तसेच मेडिकव्हर हॉस्पिटल आयुडेर्मा (स्किन, हेअर, कॉस्मेटॉलॉजी) यांच्या सहकार्याने हे शिबिर रामसेठ ठाकूर शाळेच्या मैदानावर (नवरात्रि पंडाल), सेक्टर १९, खारघर येथे पार पडले.

या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून विविध तपासण्या करून घेतल्या.

शिबिरामध्ये विशेषतः –

रक्तदाब तपासणी,रक्तशर्करा तपासणी,डोळ्यांची तपासणी,पीएफटी (फुफ्फुस तपासणी,त्वचारोग तपासणी,केसांचे विकार तपासणी,वजन कमी करण्यासंबंधी मार्गदर्शन,वेदना व्यवस्थापन,पचनसंस्थेचे आजार तपासणी व मार्गदर्शनअशा विविध तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सर्वसामान्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज उपलब्ध करून देणे हा या शिबिरामागील मुख्य हेतू होता. या उपक्रमाचा लाभ खारघर व परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला.हे शिबिर भाजपा रायगड उत्तर जिल्हा चिटणीस श्री ब्रीजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले