खारघर येथील जलवायु फेज १ समोरील नाल्याची तातडीने साफसफाई व झाकणाबाबत श्री.बृजेश पटेल यांचे उपआयुक्त श्री वैभव विधाते यांना लेखी निवेदन
खारघर/प्रतिनिधी, दि.१० सप्टेंबर २०२५-खारघर येथील जलवायु फेज १ समोरील नाल्याची तातडीने साफसफाई व झाकणाबाबत भाजप खारघर मंडळाचे जिल्हा सचिव श्री. बृजेश पटेल यांनी पनवेल महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री वैभव विधाते यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
सदर नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा व शेवाळ साचल्याने पाण्याचा निचरा थांबला असून, परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. या कारणामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
भाजप उत्तर रायगडचे जिल्हा सचिव पनवेल महानगरपालिकेकडे तातडीने नाल्याची सफाई करून गाळ काढण्याची तसेच भविष्यातील अस्वच्छता टाळण्यासाठी नाला झाकण्याची मागणी केली आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल व सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.