लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या १० लाख रुपयांच्या देणगीतून इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन

 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या १० लाख रुपयांच्या देणगीतून इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन





पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील रिटघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांनी दिलेल्या १० लाख रुपयांच्या देणगीतून इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच त्यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत दुंदरे यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे व मोफत शालेय गणवेश वाटप तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सौजन्याने वह्या वाटपाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला.

        या वेळी विद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्युनिअर कॉलेजच्या इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनलसाठी आणखी १० लाख रुपये देणगी जाहीर केली तर राहुल ड्रेसेस पनवेल यांच्याकडून १५ गणवेश मोफत देण्यात आले, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी वर्गणी काढून इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच सुभाष भोपी, बाळाराम भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, विलास भोपी, उपसरपंच शितल भोपी, माजी सरपंच रमेशशेठ पाटील, एम. के.कोंगेरे, व्ही.यू.जगताप, प्रल्हाद भोपी, वासुदेव भोपी, भारत भोपी, गोपीनाथ भोपी, पोलीस पाटील दिपक पाटील, कृष्णा पाटील, विष्णू भगत, प्रल्हाद भोपी, विश्वनाथ भोपी, नवनाथ भोपी, संतोष पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी.कारंडे, ए. ए.पाटील आदी उपस्थित होते

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image