खारघर रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम

 खारघर रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम 


खारघर/प्रतिनिधी दि.१०-रोटरीच्या या वर्षीच्या पर्यावरण सुरक्षा प्रकल्पाचा एक भाग म्हणुन रोटरी खारघर मिड टाऊन तर्फे खारघर येथील ग्रीन फिंगर्स शाळेत ई-कचरा गोळा करण्यासाठी बॉक्स बसावला . 250 हून अधिक विद्यार्थी , शिक्षक रोटरी सदस्य यावेळी उपस्थित होत़े.  

ई कचरा वेगळा काढून त्याचे व्यवस्थित विल्हेवाट लावणे कसे गरजेचे आणि  महत्त्वाचे आहे हे मुलाना पटवून देण्यात आले.  प्रत्येक महिन्याला हा कचरा गोळा करून तो रिसायकल करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान केला जाणार आहे.  तसेच पुढे जाऊन सोलर पेनल व वॉटर aerators अमलात आणण्याची योजना आहे या कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष रो. डॉ रविकिरण,  रो डॉ कोमल गुंडेवार, ग्रीन स्कूल परियोजना अध्यक्ष रो भरत जैन,  रो  शाम फडणीस, रो  जी के मिश्रा,  रो डॉ किरण कल्याणकर,  रो नंदकुमार मेहता रो विशाल अगरवाल,  व शाळेचे शिक्षक कर्मचारी व 250 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.