भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमधे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत उभा राहील - शिवसेना उपनेते बबनदादा पाटील
पनवेल दि. २५ ( वार्ताहर ) : भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमधे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत उभी राहील असे प्रतिपादन शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी पनवेल विधानसभेतील पाली देवद शाखेत उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, शिवसेना शाखा प्रमुख माने यांच्या माध्यमातून दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थी आणि वीज वितरण कंपनीतील कार्यतत्पर योद्ध्यांचा सत्कार करताना केले.
यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, मा. नगरसेवक अतुल पलन, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, विधानसभा अधिकारी अजय पाटील, पाली देवद शाखेत उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, शिवसेना शाखा प्रमुख माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमधे शिवसेना त्यांच्या सोबत उभी राहील आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांचा व वीज वितरण कंपनीतील कार्यतत्पर योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला .