के.आं.बांठिया महाविद्यालय नवीन पनवेल आयोजित आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी संपन्न

के.आं.बांठिया महाविद्यालय नवीन पनवेल आयोजित आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी संपन्न




नवीन पनवेल/प्रतिनिधी,दि.६-  काल शनिवार दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ९ ते साडे दहा या वेळेत के.आं.बांठिया महाविद्यालय नवीन पनवेल येथे आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्राचार्य श्री.बी.एस.माळी सर यांच्या शुभहस्ते श्री.विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन करून वारीला सुरुवात करण्यात आली.त्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनी रंगीबेरंगी पोशाखात  उपस्थित होते.सगळ्यांनी वारकऱ्यांच्या वेश परिधान करून छान असं रिंगण तयार केलं.फुगड्या घातल्या,विद्यार्थ्यांनी लेझीम पथकावर नाच केला आणि मग वाजत गाजत शाळेच्या समोरच्या दर्शनी भागातून विद्यार्थ्यांची लेझीम आणि बँड पथकाची वारी मैदानावरून विठुरायाच्या मंदिरात नेण्यात आली.त्या ठिकाणी पालखी ठेवून विठुरायाची आरती करून  विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून नाच केला.त्यानंतर विठ्ठलाची आरती केली आणि मग परत वाजत गाजत यथा सांग पूजा करून सर्व विद्यार्थी रांगेने शाळेत हजर झाले.अशाप्रकारे सांस्कृतिक प्रमुख सौ.आशा लता पाटील,सौ राजश्री गुंड आणि कार्यक्रम प्रमुख शेळके सर आणि सी.जी.म्हात्रे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम पार पडला.

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक ए.डी.आंबरे पर्यवेक्षक बी.यु.महाजन,गोखले ए.जी.,पर्यवेक्षिका सौ.एस.आर.वेलणकर.छाया चित्रीकरण :सौ.ज्योती पी.भामरे यांनी केले;तर कार्यक्रम प्रमुख म्हणून श्री. शेळके एस.डी.,श्री.म्हात्रे सी.जे.,श्री.पवार एस.एल.यांनी परिश्रम घेतले.