आषाढी एकादशी निमित्त पनवेल मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे खिचडी वाटप

आषाढी एकादशी निमित्त पनवेल मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे खिचडी वाटप

पनवेल/प्रतिनिधी,दि.६-

रविवारी आषाढी एकादशीनिमित्त पनवेल मधील भाजी मार्केट परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महानगर प्रमुख आणि शिवसेना पॅरामेडिकल सेलचे कोकण विभाग प्रमुख राजाभाऊ नलावडे यांच्या पुढाकाराने भक्तांना खिचडी केळी आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. भक्ती भावाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना त्याच भक्तीभावाने व सात्विक अशा उपवासाच्या पदार्थांचे प्रसाद फराळ म्हणून वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला व शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कौतुक केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, विनोद साबळे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे व फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, करंजडे महिला शहर प्रमुख अंजू सिंग, उज्वला ताई, अविनाश गव्हाणकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख मिलिंद शहारे, करंजाडे शहर प्रमुख सचिन होकीरे शिवसेना पॅरामेडिकल सेल जिल्हाप्रमुख , तुकाराम सरक कळंबोली शहर प्रमुख, वसंत सोनवणे, राहुल सुरवसे , विजय लवटे, किशोर जाधव, आतिष वाघ यांसह शिवसैनिक व पत्रकार बंधू उपस्थित होते.