खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत एनआयसीयू केंद्राला सुरुवात

खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत एनआयसीयू केंद्राला सुरुवात

*नवी मुंबई* : खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सने नवजात शिशूंच्या आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज व अद्ययावत असे निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) सुरू केले आहे. ३० जून रोजी या निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिटसह (एनआयसीयू) 'ओपन हाऊस व्हिजिट महिला आणि बाल विभाग'  याचे उद्‌घाटन करण्यात आले. या एनआयसीयूमध्ये सर्वाधिक जोखीम असलेल्या बाळांवर उपचार करण्यात येणार आहेत.  

गर्भधारणेदरम्यान गर्भवती मातांना अनेकदा उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह किंवा अकाली प्रसुती यासारख्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, तर अकाली जन्मलेल्या तसेच जन्माजात दोष असलेल्या नवजात शिशुंना श्वासोच्छवासाच्या समस्या, संसर्ग किंवा कमी वजनासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जन्मजात दोष असलेल्या बाळांना तसेच आधुनिक वैद्यकिय उपचार व देखरेखीची गरज असलेल्या नवजात शिशूंसाठी हे विशेष युनिट नक्कीच फायदेशीर ठरणार असून यामाध्यमातून  यशस्वी उपचार केले जातील अशी प्रतिक्रिया वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना गुप्ता यांनी व्यक्त केली.

नवजात शिशु, विशेषतः अकाली जन्मलेल्या किंवा जन्मजात दोष असलेल्या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. याठिकाणी उपलब्ध असलेल्या निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू)  हे प्रत्येक बाळाच्या गरजांनुसार तयार केले असून प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या ठिकाणी चोवीस तास काम करणाऱ्या नवजात तज्ञ, परिचारिका आणि बालरोग तज्ञांची टीम चोवीस तास कार्यरत राहणार असल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. अनुरंजिता पल्लवी यांनी दिली.

आम्ही या भावनिक आव्हानात्मक काळात पालकांना शिक्षित करण्यावर देखील लक्ष केंद्रित करतो, जेणेकरून त्यांचा पालकत्वाचा प्रवास सुखकर होईल. ही सुविधा योग्य आणि सुरक्षित गर्भधारणेसाठी विशेषतः प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी पुरवत असल्याची माहिती नवजात शिशु तज्ज्ञ आणि एनआयसीयू प्रभारी डॉ. तन्मेष कुमार साहू यांनी दिली.

निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) विभागाचा शुभारंभ हा महिला आणि नवजात शिशूंना योग्य काळजी प्रदान करण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करते. प्रसूतीपूर्व समुपदेशन आणि स्त्रीरोगविषयक समस्यांपासून ते नवजात शिशुंच्या काळजीपर्यंत आमची टीम कुटुंबियांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करते. आई आणि बाळाला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची पुरवित असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मेडीकव्हर हॉस्पिटल्समधील महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी स्पष्ट केले.