रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनचा पदग्रहण समारंभ संपन्न
खारघर (प्रतिनिधी)-रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रोटरीयन श्री शैलेश पटेल यांनी अध्यक्षीय सूत्रे नवीन अध्यक्ष रोटरीयन डॉ . रविकिरण यांना रोटरी कॉलर देऊन सुपूर्द केली. तसेच सचिव पदी रोटरीयन वनिता पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन अध्यक्ष यांनी आपले संचालक मंडळ जाहीर केले.
हा कार्यक्रम AC पाटील कॉलेच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संतोष मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रो. लक्ष्मण पाटील हे सन्माननीय पाहुणे लाभले. तसेच पुणे रोटरी डिस्ट्रिक्ट मधील अनेक मान्यवर उपस्थित होते . क्लबचे अनेक रोटरी सदस्य, कुटुंबीय त सेच मित्रपरिवार उपस्थित होते.
या प्रसंगी गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती चलचित्राद्वारे देण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपले पुढील वर्षांत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
रोटरी क्लब नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम घेत असते. या वर्षी पर्यावरणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे .