आषाढी एकादशीनिमित्त खारघर येथे आषाढी दिंडी-आ.प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
खारघर/प्रतिनिधी,दि.६- आज आषाढी एकादशीनिमित्त खारघर येथे खारघर आषाढी दिंडी समिती व सकल हिंदू समाज खारघर यांच्या वतीने सेक्टर 12 येथील राम जानकी मंदिर येथून दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर हे देखील उपस्थित होते. अनेक वर्षांपासून सदर दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतात. विठुरायाचा गजर करत अनेक जण संतांच्या विचारांचा गजर करत विठ्ठल रुक्माई चे नामस्मरण करत नवरंग चौक केंद्रीय विहार या मार्गाने सेक्टर 3 बेलपाडा येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात सदर दिंडीचा सांगता सोहळा होतो. सदर दिंडी मार्गावर विविध सामाजिक संस्थेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाणी वितरण केळी वितरण तसेच साबुदाण्याच्या खिचडीचे वितरण करण्यात आले.