पनवेल महानगरपालिका क्षेत्रात धुळी प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधूनिक यंत्रणेचा प्रभावी वापर


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात धुळी प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधूनिक यंत्रणेचा प्रभावी वापर


पनवेल दि.17: – वाढत्या धुळी प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण  विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार महापालिका कार्यक्षेत्रातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापराबरोबरच जनजागृती देखील करण्यात येत आहे. 

     महानगरपालिकेने पालिका कार्यक्षेत्रात 4 फॉग कॅनन वाहने (सूक्ष्म धूळ नियंत्रण करणारी यंत्रे) कार्यरत केली असून, या वाहनांद्वारे चारही प्रभागामध्ये दररोज धूळ प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने सूक्ष्मरित्या पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. याबरोबरच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता निरीक्षण करणेसाठी मोबाईल एअर क्वालिटी मॉनिटरींग व्हॅन (A Mobile Air Quality Monitoring Van) कार्यरत आहे. या गाडीच्यामार्फत पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन हवा प्रदूषण गुणवत्ता पातळी तपासली जात आहे.

     पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बेकरी  युनिट्सना लाकूड व कोळशाचा वापर थांबवण्याचे आणि या युनिट्स सीएनजी गॅस किंवाविद्युत तंदूर  वापरण्यासाठी  रुपांतरीत करण्याबाबत आतापर्यंत 151 नोटीस  जारी  करण्यात आल्या आहेत. तसेच मा. उच्च न्यायालय मुंबईच्या आदेशानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी  प्रभाग अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग स्तरीय हवा प्रदूषण नियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. प्रभाग अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग स्तरीय हवा प्रदूषण नियंत्रणासाठी भरारी पथके गठित करण्यात आली आहेत.

     महत्वाचे म्हणजे पनवेल महानगरपालिकेद्वारे दिपावली सणाच्या अनुषंगाने भारत सरकार , अधिसूचना क्रमांक G.SR.682  (E) dt 5.10.1999  अन्वये 125 db (AI) पेक्षा जास्त आवाज निर्माण  करणाऱ्या फटाक्यांच्या वापराच्या मनाईबाबत प्रसार नागरिक आणि फटाके विक्री करणारे व्यावसायिक यांना जाहीर आवाहन करण्यात येते.

*माहिती वाहन*

   याबरोबर संपूर्ण पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात धूळ प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि विविध मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने माहिती , शिक्षण, आणि संवाद वाहन (IEC-Information Education and Communication Vehicle) सुरू करण्यात आले आहे. या वाहनामार्फत पर्यावरण विषयक माहिती , माझी वसुधंरा अभियान, प्लॉस्टिक बंदी जनजागृती , प्रदूषण नियंत्रण विषयक विविध मोहिमा , पर्यावरण पूरक सण-उत्सव शासनाचे पर्यावरण विषयक विविध उपक्रम याबाबतची माहिती प्रसारित करून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते आहे.

    तसेच पनवेल महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या 164  बांधकाम विकासक, व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रतिबंधासाठी हिरवे पडदे ( ग्रीन नेट)धातूचे पत्रे  लावण्यासंबंधी  मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.                 

चौकट

             *धूळ प्रदूषण नियंत्रणाकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या उपाययोजना*

  पनवेल  महानगरपालिकेच्या  सर्व  प्रभाग क्षेत्रामध्ये हवेची  गुणवत्ता  वाढविण्याच्या  दुष्टीकोनातून  हवा  शुद्धीकरण करणेसाठी हवा शुद्धीकरण  यंत्रे  (Air Purification Systems)  स्थापन करण्यासाठी निविदा क्रिया सुरू आहे. यामध्ये खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे ,पनवेल मधील विविध 10 ठिकाणी  ही हवा शुद्धीकरण  यंत्रे बसविण्यात येते.

 पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील  हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तसेच हवामान घटकांचे जसे की वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, तापमान व  पर्जन्यमान  इत्यादी घटकांचे निरिक्षण करणे व हवेच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांना अचूक माहिती  देण्यासाठी 7 ठिकाणी रिअल टाईम ॲम्बीएंट एअर क्वालिटी मॉनिटर ॲण्ड डिस्प्ले बोर्ड (Real time Ambient Air Quality Monitor & Display board) स्थापन करणेसाठीची निविदा  प्रक्रिया सुरू आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image